Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मविआच्या ‘त्या’ प्रश्नाला उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं उत्तर; म्हणाले… 

113
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मविआच्या ‘त्या’ प्रश्नाला उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं उत्तर; म्हणाले… 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विदर्भ दौऱ्यावर असून, अकोला येथील महामेळाव्यात फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, या योजनेमुळे आपण पुढे जात आहोत. या योजनेचा त्रास महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) होत आहे. ते रोज या योजनेवर बोलत आहेत. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले. योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले. मात्र हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर योजनेसाठी सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केले. तेव्हा सरकारने त्यांना पुढील बजेटपर्यंत पैसे ठेवल्याचा दाखल दिला”, असे फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडक्या बहिणींचा त्रास आता मविआला होत आहे. हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर स्वतःचे थोबाड लावतात अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.  

(हेही वाचा – Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणारा बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक )

1500 रुपयांचे महत्त्व काय, गृहिणीला विचारा

पुढे फडणवीस म्हणाले, आता विरोधकांकडून 1500 रुपयांनी काय होते? असा सवाल होतो. मात्र ते तरी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले तरी त्या 1500 रुपयांचे महत्त्व काय आहे हे गृहिणीला विचारा. महिन्याच्या शेवटी याच 1500 रुपयांचे महत्त्व असते. मात्र जे लोक हॉटेलमध्ये जाऊन 1500 रुपयांची टीप देतात, त्यांना या रक्कमेचे महत्त्व कधीच समजू शकत नाही. त्यामुळे बहिणींची थट्टा करणे सुरू आहे. मात्र हे सावत्र भाऊ असल्याचे बहिणींच्याही लक्षात आले आहे”, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर Raj Thackeray काय काय म्हणाले? )

जे खोटे असते त्याचे वय छोटे असते

पुढे ते म्हणाले, लोकसभेत खोटा प्रचार त्यांनी केला. एक खोटा नेरेटीव्ह मुस्लिम समाजात देखील पसरवण्यात आला होता. लोकसभेत आपल्या जागा कमी आल्या. मात्र आपले मताधिक्य कमी झालेले नाही. त्यांच्यापेक्षा फक्त 2 लाख मते आपल्याला कमी मिळाले. भाजपच्या 12 जागा केवळ 3 टक्के मतांनी पडल्या. धुळे हे त्याचे उदाहरण आहे. अतिशय कमी मतांनी धुळ्यात पराभव झाला. मात्र जे खोटे असते त्याचे वय छोटे असते”, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

खोटा नरेटीव्ह हा 3 वर्षापासून सुरू

तसेच पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबत नाही तर चौथ्या म्हणजे खोट बोलणाऱ्या सोबत झाला. खोटा नरेटीव्ह (Political False Narrative) हा 3 वर्षापासून सुरू झाला. 400 पार झाले तर आरक्षण जाणार संविधान बद्दलवणार असा खोटा प्रचार केला”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. (Devendra Fadnavis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.