लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणार; खासदार Vishal Patil हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देणार पाठिंबा

212

लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातील लढत चांगलीच चर्चेत आली होती. याठिकाणी महाविकास आघाडी असूनही उद्धव ठाकरे यांनी परस्पर उबाठाचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली. तरीही काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक जिंकली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या राजकारणाची आता खासदार विशाल पाटील विधानसभेत परतफेड करण्याच्या तयारीत आहेत.

(हेही वाचा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर Uddhav Thackeray यांनी बोलावे; पू. संभाजी भिडे यांचे आवाहन)

सुहास बाबर याना देणार पाठिंबा 

खानापूर मतदारसंघात सुहार बाबर यांच्या पाठिशी असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे. खासदार विशाल पाटील  (Vishal Patil) म्हणाले की, मतांच्या स्वरुपात लाखांच्या आकड्यात सुहास बाबर यांना पाठिंबा मिळावा. आम्ही अपक्ष आहोत, कुणाला घाबरत नाही. आम्हाला कुणी बोलायचे कारण नाही. जिथे आमच्यावर प्रेम दिसते तिथे आम्हाला प्रेम द्यायचे कळते, त्यामुळे आम्ही ताकदीवे तुमच्या पाठिशी राहणार यात शंका नाही, अशी त्यांनी जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेलाही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी भिडण्याचे ठरवले आहे. तर सगळ्यांमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे. आम्हाला भाजपाप्रणित महाराष्ट्रद्वेष्टे सरकार आहे ते घालवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी विशाल पाटलांच्या  (Vishal Patil) भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. या मतदारसंघातून संभाव्य उमेदवार सुहास बाबर आहेत. शिवसेनेनकडून या मतदारसंघातून अनिल बाबर आमदार झाले होते, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता, त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या जागेवरून कोण निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आता अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांचे नाव समोर आले आहे, त्यांना विशाल पाटील  (Vishal Patil) यांनी पाठिंबा दिल्याने या ठिकाणी लोकसभेनंतर विधानसभेतही उद्धव ठाकरे यांना फटका बसणार हे निश्चित.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.