जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री! शिवसेना भवनसमोर मनसेची बॅनरबाजी

74

दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन आणि दादर परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

मनसेच्या शिवसेना भवनसमोरील पोस्टरमध्ये राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. दादरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनर्सवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…! हिंदुजननायक राज ठाकरे असा उल्लेख करण्यात आला आहे. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

New Project 10 1

राज ठाकरेंच्या घरासमोरही बॅनरबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या घरासमोर झेंडे, बॅनर लावून पूर्ण परिसर सजवण्यात आला आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त राज ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी सभा होणार आहे. त्यामुळेच मनसेचे झेंडे लावून संपूर्ण परिसर सजवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.