-
खास प्रतिनिधी
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शनिवारी २२ फेब्रुवारी २०२५ या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पदार्पणातच पराभव
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवरून वाद निर्माण झाले. तर दादर-माहीम या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नसल्याने राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना पदार्पणातच पराभवाचा सामना करावा लागला, अशी भावना मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे समाज माध्यमावरही संताप व्यक्त करण्यात आला. (Uday Samant)
(हेही वाचा – Budget Session : अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय रणसंग्राम)
संबंध सुधारण्याचे प्रयत्न
राज ठाकरे यांनीही मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना महायुतीवर टीका केली. तसेच अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या सुरात सूर मिसळून ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरे यांनी तोफ डागली. ते बिघडलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठी शिंदे यांच्या विश्वासातील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा
सामंत (Uday Samant) यांनी शनिवारी सकाळीच ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांना आपण विनंती केली आणि ते विनंतीला मान देऊन पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आपण ही भेट घेतली, असे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा न होता, मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. आमची राजकीय भेट नव्हती, असेही सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community