Hassan Nasrallah च्या हत्येवर मेहबूबा मुफ्तींचे मगरीचे अश्रू; निवडणूक रणनीती की दु:ख?

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पीरपंजाल आणि दक्षिण जम्मू क्षेत्रात मतदान होत आहे. या ठिकाणी हिंदू मतदार अधिक संख्येने आहेत. त्याठिकाणी पीडीपीला विशेष यश मिळणार नाही. हे मेहबुबा मुफ्ती चांगलेच जाणून आहेत.

110
इस्राईलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाह (Hassan Nasrallah) ठार झाला. त्यामुळे आखाती देशांमध्ये खळबळ उडाली. मात्र याचा फायदा जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरु आहे. पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नसरल्लाहच्या हत्येला श्रद्धांजली म्हणून रविवार, २९ सप्टेंबर रोजी एक दिवस निवडणुकीचा प्रचार करणार नाही, असे घोषित केले. प्रत्यक्षात हा त्यांचा दिखाऊपणा आहे, मगरीचे अश्रू आहेत, कारण तिसऱ्या टप्प्यात ज्या भागात मतदान आहे तिथे पीडीपीचे काहीही प्राबल्य नाही, त्यामुळे प्रचार केला काय किंवा नाही केला, पीडीपीला काहीही फायदा होणार नाही, तरीही इस्त्राईलच्या हल्ल्याचा निषेध केला म्हणून मुसलमानांनामधील कट्टर गटाची तरी थोडी फार मते मिळतील, याच्यासाठी मुफ्ती यांचा हा खटाटोप सुरु आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे रणनीती?

मेहबुबा मुफ्ता यांची ताकद असलेल्या विधानसभा क्षेत्रांत पहिल्या २ टप्प्यांत मतदान झाले आहेत. ती आहेत उत्तर काश्मीर आणि जम्मूचा काही भाग आहे. आता तिसऱ्या टप्प्यात पीरपंजाल आणि दक्षिण जम्मू क्षेत्रात मतदान होत आहे. या ठिकाणी हिंदू मतदार अधिक संख्येने आहेत. त्याठिकाणी पीडीपीला विशेष यश मिळणार नाही. हे मेहबुबा मुफ्ती चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे या भागात मतदानाच्या दिवसाच्या आधी एक दिवस दौरा प्रचार करू काही हाती लागणार नाही, पण इस्त्राईलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नसरल्लाहच्या (Hassan Nasrallah) मृत्यूला शोक करून त्याच्यावरील हल्ल्याचा निषेध करून मुलामानांमधील कट्टर गटाची सहानुभूती मताच्या रूपाने काही प्रमाणात मिळेल, अशी अपेक्षा मेहबुबा मुफ्ती यांना आहे. म्हणूनच त्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवस प्रचार न करण्याची घोषणा केली आहे.

मेहबूबाची रणनीती की मजबुरी

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा त्यांच्या समर्थकांमध्ये ऊर्जा आणण्याचा आणि राजकारणात इस्लामिक टच आणण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. 1987 नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे ज्यावर कोणत्याही मजबूत संघटनेने बहिष्कार टाकलेला नाही. त्यामुळे घाटी पक्षात सुरुवातीपासूनच अस्वस्थता दिसून येत आहे. यासोबतच माजी सहकारी सज्जाद लोन आणि अभियंता रशीद यांच्या प्रभावाने मेहबूबा मुफ्ती यांना सुरुवातीपासूनच कमकुवत केले आहे. लोकसभेनंतर काँग्रेस आणि एनसी युतीनेही त्यांना दुबळे ठरवत विरोधी आघाडीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला. एकंदरीत असे म्हणता येईल की, मेहबुबा मुफ्ती यांनी प्रचार न करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.  (Hassan Nasrallah)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.