Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

29
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (Maratha Reservation) त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आजपासून मी उपोषणाला बसत आहे. सरकार आमच्या वेदना समजेल, अशी आशा होती; पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला, ४१ वा दिवस उजाडला तरी, सरकार मराठा आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation)

अशातच मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रश्नांवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर उत्तर दिलं आहे.

(हेही वाचा – Western Railway: पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड; लोकलच्या ३१६ फेऱ्या रद्द)

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी सरकार जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. जेवढ्या वेगाने हा प्रश्न सोडवता येईल तेवढ्या वेगाने आम्ही प्रयत्न करू. गिरीश महाजन यांनी त्याच दिवशी संवाद साधला. आमचा प्रयत्न सुरू आहे. मीडियाच्या माईकसमोर संवाद होऊ शकत नाही. संवाद करायचं तर दहा माणसं बसवा. शंभर माणसं बसवा. माईक समोर संवाद होत नाही. चार गोष्टी तुम्ही सांगा, आम्हीही चार गोष्टी सांगू. आमचं त्यांना चर्चेचं नेहमीच आवाहन आहे. मुख्यमंत्रीच स्वतः चर्चा करत आहेत. कायद्याने काय प्रश्न असेल तर मार्गी लावू. शिंदे समिती काम करत आहे. वाऱ्यावर कुणालाच सोडलं नाही.

आंदोलकांनी (Maratha Reservation) हिंसा करू नये. लोकशाहीत गावबंदी करणं योग्य नाही. आपण प्रत्येकाला समजावू शकत नाही. आमचा प्रयत्न शांतता राहावी असा हिंसा होऊ नये. प्रश्न सोडवण्याचं काम आम्हीच करत आहोत. त्यांचा प्रश्न सोडवणं हेच आमचं काम आहे. तेच आम्ही करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.