Maratha Reservation : वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरूच

21
Maratha Reservation : वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरूच

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता राज्यभर पाहायला मिळत आहे. यामुळेच आता उशिरा रात्रीपर्यंत वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र पहावयास मिळत आहे. यवतमाळ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवून संध्याकाळी (३० ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांची जवळपास अर्धा तास चर्चा केली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील काल (३० ऑक्टोबर) दिवसभर छत्तीसगड येथे प्रचार सभांमध्ये जाऊन आल्यानंतर उशिरा रात्री वर्षावर पोहोचले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचे उग्र स्वरूप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

आज म्हणजेच मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी कॅबिनेट बैठकीच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक करत आजच्या कॅबिनेट बैठकीसंदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Dharashiv curfew : आंदोलक आक्रमक : बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी)

पोलीस महासंचालक देखील पोहोचले वर्षा निवासस्थानी

राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे देखील वर्षा निवासस्थानी उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुढील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांसंदर्भात बोलले. उशिरा रात्री झालेल्या या बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागील अंतर्गत माहिती घेण्यासाठी पोलीस महासंचालकांना पाचारण करण्यात आले होते.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. आता तर आमदारही या वादातून सुटू शकले नाही. सोमवारी सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी आग लावली. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आरक्षण आंदोलकांनी दगडफेक करत त्यांच्या वाहनांना आग लावली. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी रास्ता रोको आणि जाळपोळ केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.