Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

16
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही दिली होती. आता उपमुख्यमंत्री पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच असं ठामपणे सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (17 सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देणार नाही. पण आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, “समाजाची दिशाभूल होता कामा नये. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे, ज्यांची नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. अशा लोकांची माहिती मिळवली पाहिजे आणि खरच कुणबी असेल तर त्याला ओबीसी यांना देखील काहीच आक्षेप नाही. पण, त्यांचा सरसकट मराठ्यांना दाखला देण्यावर आक्षेप आहे. तसेच अशी कोणतेही भूमिका, कोणताही विचार राज्याची नाही की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाचा आरक्षण (Maratha Reservation) आहे तेवढंच ठेवून, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, यासाठी सरकारचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.”

(हेही वाचा – Shantiniketan : रवींद्रनाथ टागोरांचे स्वप्न असलेल्या शांतिनिकेतनला जागतिक वारसास्थळाचा दर्जा, युनेस्कोची घोषणा)

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा (Maratha Reservation) या दोन समाजात संघर्षाची ठिणगी पडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये, असे फडणवीस म्हणाले होते. तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काही झाले तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींचे आरक्षण (Maratha Reservation) कमी होणार नाही वा काढूनही घेतले जाणार नाही. याबाबत ओबीसींनी भीती बाळगू नये. ओबीसी समाजानेही या प्रकरणी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.