Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात

73
Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात
Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात

मणिपूर (Manipur Violence) सरकारने अतिरेक्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी मंगळवारी सांगितले की, जिरीबाम जिल्ह्यात अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेल्या तीन मुलांचे आणि तीन महिलांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिरीबाममध्ये (Jiribam) ७ आणि ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुर्दैवी घटनांनंतर सीआरपीएफच्या दोन कंपन्या तेथे पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर लगेचच पाच अतिरिक्त कंपन्या तेथे तैनात करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. (Manipur Violence)

कारवाई सुरूच राहणार
अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र काही आरोपींची ओळख पटली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी जिरीबाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 10 कुकी-जो अतिरेकी मारले गेले. यानंतर कुकी अतिरेक्यांनी मेतेई कुटुंबातील 6 लोकांचे अपहरण केले होते. यामध्ये तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश होता. त्यांनी जिरीबामच्या मदत छावणीत आश्रय घेतला होता. 16 नोव्हेंबर रोजी त्यांचे मृतदेह नदीत तरंगताना आढळून आले. (Manipur Violence)

यातील तीन मृतदेहांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट रविवारी आले. या मृतदेहांमध्ये 3 वर्षाच्या चिंगखेंगनबा या चिमुकलीचाही समावेश आहे. डॉक्टरांना मुलाच्या डोक्यात गोळीची जखम आढळून आली. मेंदूचा एक भाग आणि उजवा डोळा गायब होता. मुलाच्या डोक्यात जवळून गोळी झाडण्यात आली असून, त्यामुळे त्याच्या मेंदूचा काही भाग उडून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या छातीवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी चाकूच्या जखमा आणि हाताला फ्रॅक्चर आढळले. (Manipur Violence)

CAPF च्या 288 कंपन्या तैनात
जिरीबाम येथून सहा जणांचे अपहरण करून त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर या भागातील परिस्थिती चिघळली. येथे हिंसाचार वाढला, त्यामुळे केंद्रीय सशस्त्र दलाच्या 288 कंपन्या तैनात करण्यात आल्या. शुक्रवारी आणखी 90 कंपन्या तैनात करण्यात आल्या. मणिपूरचे मुख्य सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह म्हणाले होते की, कंपन्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात आहे. CRPF, SSB, आसाम रायफल्स, ITBP आणि इतर सशस्त्र दलांच्या कंपन्या मणिपूरमध्ये तैनात आहेत. (Manipur Violence)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.