नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना

95

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी तीन वेळेला धमकीचे फोन आले होते. यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. आता याप्रकरणात मंगळुरू कनेक्शन समोर आले असून नागपूर पोलिसांचे पथक तातडीने बेळगावाला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरूमधून एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. रजिया असे या तरुणीचे नाव आहे. माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीला गडकरींच्या कार्यालयात धमकी देण्यापूर्वी आम्ही तुझा नंबर एका कामासाठी वापर असल्याचे फोनवरून सांगितले होते. रजियाला फोन करून सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव जयेश पुजारी असे सांगितले होते. त्यामुळे गडकरी यांच्या कार्यालयाला बेळगाव तुरुंगातून धमकी दिल्याच्या प्रकरणात आता मंगळुरू कनेक्शन आले आहे.

तसेच बेळगावच्या तुरुंगामधूनच गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आल्याचे स्पष्ट झाले आहेत. सध्या रजिया ही तरुणी मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल असून सध्या स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी आणि धमकी दिल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी नागपूर पोलीस कर्नाटक प्रशासनासोबत संपर्कात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन धमकीचे फोन आले होते. सकाळी १०.५५ला पहिला फोन आला होता, पण त्यामध्ये काही बोलणे झाले नव्हते. त्यानंतर ११ आणि ११.५५ वाजता पुढील दोन फोन आले, ज्यामध्ये जयेश पुजारी बोलत असल्याचे सांगत दहा कोटींची मागणी केली होती. तसेच याबद्दल पोलिसांना माहिती देऊ नये, असा इशाराही देण्यात आला होता.

(हेही वाचा – ते खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, जनतेचे नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.