महायुतीला १७८-२०० जागा मिळणार; एक्सिस माय इंडियाचा Exit Poll काय सांगतो?

151

अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल (Exit Poll) आला आहे. यामध्ये महायुतीच पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते, असा कौल देण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार (Exit Poll), महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा Assembly Election 2024 : मुंबईतही महायुती पुढे; किती जागांचा असणार फरक?)

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) भाजपाला ९८ ते १०७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ५३ ते ५८ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना २ ते ५ जागा मिळतील, असा अंदाज यात देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला २८ ते ३६ जागा, शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३२ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ ते ३० जागा आणि मविआतील अन्य पक्षांना २ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज देण्यात आला असला तरी वंचित बहुजन आघाडीला ३ टक्के मते मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अन्य अपक्षांना ६ ते १२ जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे. (Exit Poll)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.