Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीमच्या जाहीर सभेत सदा सरवणकरांना का झाले अश्रू अनावर ?

151
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीमच्या जाहीर सभेत सदा सरवणकरांना का झाले अश्रू अनावर ?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीमच्या जाहीर सभेत सदा सरवणकरांना का झाले अश्रू अनावर ?

माहीम विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी प्रभादेवी येथे जाहीर सभा घेतली. सदा सरवणकर मंचावर बसलेले असताना मुलीच्या भाषणाने त्यांना अश्रू अनावर झाले. ‘माझ्या वडिलांचा मी लहाणपणापासून प्रवास बघितला. माझा जन्म जेव्हा झाला, त्यावेळी संप सुरु होता. त्यावेळी माझ्या मुलांना दूध मिळायला हवं, त्यासाठी ते कामाला जात होते. मला अभिमान आहे त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो, हे दाखवून दिले.’ असं मुलगी प्रिया सरवणकर- गुरव (Priya Saravankar) म्हणाली. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक!)

“संजय राऊत (Sanjay Raut) यांचा राजकीय प्रवास हा बाळासाहेबांनंतरचा आहे. जेव्हा जेव्हा सामनावर किंवा संजय राऊतांवर काँग्रेसवाले मोर्चे घेऊन यायचे तेव्हा हा आम्हाला फोन करायचा. संजय राऊत कधीही शिवसैनिक नव्हता, हा फक्त सामनाचा संपादक होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून मतं मागितली आणि शेवटच्या क्षणी अभद्र महाविकास आघाडी झाली. 2019 साली माझ्या मागे पहिलं कोणी लागलं ते म्हणजे आदित्य ठाकरे.” असा दावाही सदा सरवणकरांनी केला. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Jharkhand Assembly Election: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गज नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला)

“पंधरा वर्षे सदा सरवणकर यांनी आपली सेवा करत आहे. एका प्रामाणिक शिवसैनिकांच्या मागे उभे राहण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. लोकसभेला आपण पाहिलंत मंत्रीपद देताना मुलाला मंत्रीपद न देता, सामान्य शिवसेनेच्या खासदराला मंत्रीपद दिलं. गेली अनेक वर्ष मुंबई ज्यांच्या हातात होती. त्यांनी काय केलं, मुंबईत घरंचा प्रश्न महत्वाचा आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम मुख्यमंत्री यांनी केलं. मुंबईकरांना हक्कांची घरं दिली. ज्यांनी मुंबईकरांना गृहित धरलं अशांना जागा दाखवण्याची गरज आहे.” असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.