Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदेंच्या आमदारांसाठी विशेष विमानं, महायुतीच्या गोटात नेमकं काय शिजतयं ?

201
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदेंच्या आमदारांसाठी विशेष विमानं, महायुतीच्या गोटात नेमकं काय शिजतयं ?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदेंच्या आमदारांसाठी विशेष विमानं, महायुतीच्या गोटात नेमकं काय शिजतयं ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल (२३ नोव्हें.) समोर आला आहे. यात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यापैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा (BJP) हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल ? वाचा सविस्तर…)

त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात महायुतीचा डंका; विजया मागची नेमकी कारणे काय ?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आमदार तातडीने मुंबईत पोहोचावेत यासाठी त्यांनी आमदारांना आणण्यासाठी विशेष विमानं पाठवल्याचं बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं. शिवसेनेचे नांदेडमधील तीन आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज मुंबईत या आमदारांची बैठक होणार आहे. दरम्यान, बालाजी कल्याणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे नांदेडमधील तिन्ही आमदार मुंबईला जात आहोत.” (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-BMC Election: विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार ?)

बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) म्हणाले, “हदगावचे आमदार बाबूराव कदम-कोहळीकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके आणि मी तात्काळ मुंबईसाठी रवाना होत आहे. सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.” (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.