Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी सर्वपक्षीय जोरदार फिल्डिंग; ‘हे’ आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

गृह, महसूल अन् जलसंपदा.. वजनदार खाती भाजपालाच, सूत्र ठरलं

151
Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी सर्वपक्षीय जोरदार फिल्डिंग; 'हे' आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे
  • प्रतिनिधी

भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता निश्चित झाल्याचे मानले जात असतानाच महायुतीतील सर्वच पक्षांनी मंत्रिपदांसाठी जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. युतीतील तीनही घटक पक्षांना अधिकाधिक आणि महत्त्वाची मंत्रीपदे पदरात पाडून घ्यायची आहेत. (Maharashtra Politics)

त्यामुळे आपापल्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, या निकालात सगळेच विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाच्या अनेक ज्येष्ठ आमदारांनाही मंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीत ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदांची मागणी केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी ७ जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाककडून धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अजित पवार, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, गृहनिर्माण, कृषी ही खाती मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – खातेवाटपावरून महायुतीत पेच; Uday Samant यांचा खुलासा)

मंत्रीपद मिळण्यासाठी भाजपामध्ये फडणवीस यांच्याकडेच प्रयत्न

भाजपाकडून मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असलेले सगळेच आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करत आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते, त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांच्याकडेच लॉबिंग सुरू असल्याचे दिसून येते. गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रि‍पदासह इतर महत्त्वाची खाती भाजपा स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ ही महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहतील, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातेय. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री निवडण्यासाठी BJP ला लागलाय वेळ, तेव्हा तेव्हा अनपेक्षित चेहऱ्यांची झालीय एंट्री)

शिवसेनेची संभाव्य यादी

शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्यात उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल यांची नावे मंत्रीपद मिळण्यासाठी आघाडीवर आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, पाणीपुरवठा ही खाते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या संख्या ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असतो. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.