Maharashtra Political crisis : अपात्रतेची टांगती तलवार; एकनाथ शिंदेंसह कोण आहेत ‘ते’ १६ आमदार?

उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत व ए.ए. तिवारी यांच्यासारख्या विधिज्ञांची तगडी फौज मैदानात उतरली होती.

129
अपात्रतेची टांगती तलवार
अपात्रतेची टांगती तलवार

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्ता संघर्षावरील खटल्याबाबत झालेल्या सुनावणीवर गुरुवारी, ११ मे रोजी घटनापीठाकडून अंतिम निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय नेमका काय निकाल देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांचे निलंबन होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांचे निलंबन केले होते. मात्र ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाच्या येणाऱ्या निकालामुळे निलंबनाची टांगती तलवार असलेल्या एकनाथ शिंदेंसोबतच्या त्या १६ आमदारांचे काय होणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम.आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी युक्तिवाद केला होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत व ए.ए. तिवारी यांच्यासारख्या विधिज्ञांची तगडी फौज मैदानात उतरली होती.

(हेही वाचा Vivek Agnihotri : आता प. बंगालमधील नरसंहारावर चित्रपट; विवेक अग्निहोत्री यांच्याकडून ममता बॅनर्जींना कायदेशीर नोटीस)

अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे

  • एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री
  • अब्दुल सत्तार – कृषिमंत्री
  • संदीपान भुमरे – मंत्री
  • तानाजी सावंत – मंत्री
  • संजय शिरसाट
  • यामिनी जाधव
  • चिमणराव पाटील
  • भरत गोगावले
  • लता सोनवणे
  • प्रकाश सुर्वे
  • बालाजी किणीकर
  • अनिल बाबर
  • महेश शिंदे
  • संजय रायमूलकर
  • रमेश बोरणारे
  • बालाजी कल्याणकर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.