Maharashtra Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल कधी येणार ? वाचा सविस्तर…

153
Maharashtra Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल कधी येणार ? वाचा सविस्तर...
Maharashtra Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेचे एक्झिट पोल कधी येणार ? वाचा सविस्तर...

राज्यातील 288 विधानसभा (Maharashtra VidhanSabha Election 2024) मतदारसंघासाठी आज (बुधवार 20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Maharashtra Exit Poll)

राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एक्झिट पोल (Maharashtra Exit Poll) यायला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल. (Maharashtra Exit Poll) एक्झिट पोल अनेकदा खरे ठरतात. काही वेळा एक्झिट पोलच्या उलटाही निकाल लागतो. पण तरीही नागरिकांमध्ये एक्झिट पोलची उत्सुकता असते.

एक्झिट पोल कधी येणार ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल (Maharashtra Exit Poll) २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी येईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार एक्झिट पोल्स हे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच जाहीर केले जातात. त्याच्या आधी कुठल्याही प्रकारे निकालाचे अंदाज किंवा एक्झिट पोल देता येत नाहीत. त्यामुळे मतदान संपल्यानंतर म्हणजेच २० नोव्हेंबरला संध्याकाळी ६ नंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील. (Maharashtra Exit Poll)

एक्झिट पोल कुठे पाहाल?
मतदान संपलं की महत्त्वाचे चॅनल्स सी व्होटर्स, पिपल्स पल्स, अॅक्सिस इंडिया, इंडिया टुडे, एनडीटीव्ही, रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ यांचे एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होईल. (Maharashtra Exit Poll)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.