Maharashtra Election Results 2024 : महाविकास आघाडीला मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्यांचा झाला पराभव 

213
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचाच पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचा पराभव झाला आहे. तर लातूर शहर आणि ग्रामीण धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा १० हजार मतांनी पराभव झाला आहे.  (Maharashtra Election Results 2024)

कॉंग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बुधवारी ७६.३२ टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात यश येईल असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. शनिवारी प्रत्यक्षात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम होती. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सुमारे १ लाख ४०९ मते मिळाली आहेत. तर डॉ. अतुलबाबांना १ लाख  ३९ हजार ९०४ मते मिळाली असून सुमारे ३८ हजार ३६४ मतांनी त्यांनी कॉंग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे.

(हेही वाचा – विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा आहे कि नाही; Uddhav Thackeray यांनी पराभवाचे खापर भाजपवरच फोडले)

यशोमती ठाकूर यांचा ७६१७ मतांनी पराभव

तिवसा विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपा उमेदवार राजेश वानखडे यांनी ७६१७ मतांनी त्यांचा पराभव केला. राजेश वानखडे यांना ९९.६६४ मते मिळाली. तर ठाकूर यांना ९२,०४७ मतांवर समाधान मानावे लागले.

(हेही वाचा – Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच!)

देशमुख बंधूंना धक्का?

काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या जाणाऱ्या लातूर ग्रामीण आणि लातूर शहरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा या जागेवरून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख (Amit Vilasrao Deshmukh) आघाडीवर होते, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर धीरज विलासराव देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना १ लाखांची लीड मिळाली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच लातूर ग्रामीण मधून भाजपाच्या रमेश कराड यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख फक्त ७०७३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे येथे ही अटीतटीची लढत झाली आहे.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.