Maharashtra Bandh : चौथ्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’; सर्वसामान्यांमध्ये चर्चा

119
Maharashtra Bandh : चौथ्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’; सर्वसामान्यांमध्ये चर्चा

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (२४ ऑगस्ट) ला ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली असली तरी हा ‘बंद’चा दिवसच असा निवडण्यात आला की त्याचा काही परिणामच होणार नाही आणि ‘बंद’ यशस्वी झाला, असा दावा आणि नवा फेक नरेटीव्ह सेट करण्यास संधी विरोधकांना मिळेल. चौथ्या शनिवारी आणि तोही अर्धा दिवस, दुपारी २ वाजेपर्यंत ‘बंद’, ही कुणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना आहे याचीच चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.

(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM Narendra Modi युक्रेन दौऱ्यावर; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा)

कार्यालये बंद, बँकांना सुट्टी, कॉर्पोरेट शांत

शनिवारी (२४ ऑगस्ट) सगळी शासकीय आणि निम-शासकीय कार्यालये बंद असतात. तसेच उद्या चौथा शनिवार असल्याने सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना सुट्टी असते. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट जगतही शनिवारी शांत असते. त्यामुळे शनिवारी अशीही रेल्वेमध्ये गर्दी पाहायला मिळत नाही. कदाचित, शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांनी हा बंद यशस्वी होणार असल्याचा दावा शुक्रवारी (२३ ऑगस्ट) केला आहे.

‘बंद’विरोधात जनहित याचिका

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशी असल्याने परवानगी नाकारली असली तरी या ‘बंद’विरोधात (Maharashtra Bandh) वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर तातडीची सुनावणी झाली त्यात सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र ‘बंद’ला प्रखर विरोध केला. बदलापूर प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सरकारने याप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. मग हा महाराष्ट्र बंद कशाला? असा सवाल सदावर्ते यांनी केला.

(हेही वाचा – २४ ऑगस्टचा मविआचा Maharashtra Bandh बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचे सरकारला ‘हे’ निर्देश)

‘बंद’ला बंदी

मुंबई उच्च न्यायालयाने उद्या शनिवारचा ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Bandh) हा बेकायदेशीर ठरवला आहे. राजकीय पक्षांना बंदची परवानगी नाकारत बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश कोर्टाने दिले. आता कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडीला पाळावा लागणार की ते कोर्टाचा अवमान करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.