Maharashtra Assembly Elections : ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’

146
Maharashtra Assembly Elections : ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी काही पोस्ट केली आणि नेटकऱ्यांनी ट्रोल केले नाही, असे कधीच होत नाही. शरद पवारांनी शुक्रवारी १५ नोव्हेंबर २०२४ या दिवशी पुन्हा एकदा पावसात भिजत भाषण करण्याचा स्टंट केला आणि त्यांचे मानसपूत्र जितेंद्र आव्हाड यांनी लाळघोटेपणा करत त्यांचे दोन्ही वेळेचे फोटो टाकून ‘महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे’ अशा आशयाची पोस्ट केली आणि माती खाल्ली. (Maharashtra Assembly Elections)

२०१९ कौल

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले आणि त्यानंतर त्यांना ५४ जागा मिळाल्या पण सत्ता काही आली नव्हती. जनतेने भाजपाला १०५ तर एकसंघ शिवसेनेला ५६ जागी विजय मिळवून देत भाजपा-सेनेला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलत मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली.

त्यावर एका नेटकाऱ्याने, “2019 मध्ये उद्धट ठाकरेंनी गद्दारी केली म्हणून परिवर्तन झाले होते.. एवढा मानसपुत्र पण पाऊस आल्यावर छत्री काही देत नाही साहेबांना,” याचीच आठवण करून दिली. (Maharashtra Assembly Elections)

(हेही वाचा – Sajjad Nomani यांचा नवा जिहादी संदेश; म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा हरला, तरच दिल्ली सरकार लवकर कोसळेल; आमचे लक्ष्य दिल्ली)

कोणी सांगितलं भिजायला?

आव्हाड यांनी केलेल्या पोस्टवर एकाने तर त्यांना सुनावत म्हटले की, “काय तर म्हणे, म्हातारं फिरतंय.. भरपावसात सभा घेतंय.. कोणी सांगितलं फिरायला..???? कोणी सांगितलं भिजायला??? . ते फिरतंय भिजतंय सत्तेच्या हव्यासा पोटी.. मुलीचं-परिवाराचं राजकारण सेट करायसाठी.. आडमाप पैसे ओढण्यासाठी, जमिनी लुटण्या साठी.. तुमचं काय???? असल्या भूलथापांना बळी पडू नका.”

ढोंगी पुरोगाम्यांनो, विचार करा

तर एकाने “अंधश्रद्धा पसरवत आहेत निवडणुकीच्या प्रचारात? अरे त्या दाभोळकरचा आत्मा काय म्हणेल याचा तरी विचार करा रे ढोंगी पुरोगाम्यांनो,” अशा शब्दांत अब्रू काढली. एका नेटकाऱ्याने ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’ अशी कोटी केली. “तेव्हाही सरकार बनले नव्हते!” यांची आठवण एकाने करून दिली. (Maharashtra Assembly Elections)

(हेही वाचा – Assembly Election 2024: कॅश व्हॅन पाठोपाठ आता ट्रॅकमध्ये सापडली ८० कोटींची चांदी, पुढील तपास सुरू)

अन्य काही प्रतिक्रिया जशाच्या तशा :

“२०१९ ला साहेब भिजून तब्बल ५४ आमदार निवडून आले होते त्यातले पण ४० परत पळून गेले.”

“काय परत कोरोना आणायचा आणि 10 वर्ष मागे? अरे भिकारी सगळे तुम्ही.. विकास, अर्थकारण, राज्य साठी काय करायचे पूढे अशी अक्कल कोणा कडे आहे का? आम्ही कष्ट करून टॅक्स भरायचा आणि तुमच्या सारख्या बिनडोक लोकांना पैसा वापरायला द्यायचा का? कधी स्वतः खिशातून द्या…”

“दुष्काळी भागात घेऊन जा साहेबांना तिथे पाऊस पडला तर मतं अधिक मिळतील.”

“म्हणजे 2019 प्रमाणे भाजप शिवसेना सरकार येणार तर..”

“2019 ल कोणता परिवर्तन झाला ? 53 आले तुमचे युती ल बहुमत मिळाले पण तुमच्या साहेबांनी ठाकरेंना घोळावला. आणि आता सुद्धा पाऊस काही कामा येणार नाही. तुम्ही विरोधी पक्ष नेते आता पासून सेटिंग लावा सिल्व्हर ओक वर..”

“काय परिवर्तन 54 चे 56 होतील अणि मागच्या दाराने BJP ला सपोर्ट करतील हेच गणित आहे.”

“2019 la पण साहेबाचा CM झाला नाही आणि आता पण नाही होणार 2024.”

“मंग काय जित्या तू फक्त डुक्करा EVM EVM म्हणून भुंकू नको म्हणजे झालं.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.