Maharashtra Assembly Election Result : जुळवून घेणार की Sharad Pawar फोडाफोडी करणार?

महायुतीने बहुमताचा आकडा गाठला तरी पवार महायुतीला सहजासहजी सत्तेपर्यंत पोहोचू देतील, याबाबत शंकाच आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशीही (अर्थात शिंदे-अजित पवार यांच्याकडे पुरेशा जागा असतील तर) संगनमत करून सत्तेत राहू शकतात. असे होईलच हेही सांगता येत नाही.

111
  • सुजित महामुलकर

शरद पवार म्हणजे ‘सत्तेचे समीकरण’, फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्याच शैलीत त्यांच्या पुतण्याने राजकीय धक्का दिलेला आहे. त्यामुळे शरद पवार वयाच्या ८४व्या वर्षी पक्षाच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. गेली जवळपास सहा दशके सक्रिय राजकारण आणि पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात राहिलेल्या या नेत्याला ‘पंतप्रधान’ पदाने कायम हुलकावणी दिली. आता तर त्यांनी राज्यसभेची खासदारकीही घेणार नाही, असे जाहीर करून एकप्रकारे राजकीय संन्यास घेण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. अर्थात, त्यांची ही विधाने विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Result) पार्श्वभूमीवर ‘राजकीय’ आहेत की खरंच त्यांच्या मनातील चलबिचल आहे, हे पवारच जाणोत!

WhatsApp Image 2024 11 21 at 6.48.16 PM

राजकारणाचा विचका

ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल येताच शरद पवारांनी (Sharad Pawar) जी खेळी केली आणि जो राजकारणात नवा पायंडा पाडला, त्यातून राजकारणातील साधन शुचिता संपली. युती म्हणून एकत्र निवडणूक लढविलेल्या भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही पवारांनी उद्धव ठाकरेंना फितवले, त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षेला बळ दिले, परिणामी उद्धव ठाकरे यांनी ज्या भाजपासोबत निवडणूक लढवली त्या भाजपाला सोडून ज्यांच्या विरोधात निवडणूक (Maharashtra Assembly Election Result) लढवली त्या दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यामुळे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका केला, असे राज ठाकरे यांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरते.

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

मविआ शरद पवारांची देण

शिवसेनेला भाजपापासून दूर करण्याचे पवारांनी बीज रोवले ते २०१४ मध्ये आणि त्याची फळे मिळाली ती २०१९ मध्ये. २०१४ ला शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चारही पक्ष विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढले. निवडणुकीचा निकाल पूर्ण लागला नाही तोच शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला ‘स्थिर सरकारसाठी’ समर्थन जाहीर केले. हे समर्थन देण्यामागचे खरे कारण काय होते, ते त्यांनी स्वतः पाच-सहा वर्षांनंतर उघड केले, ते असे की, शिवसेनेला भाजपापासून दूर करणे. यावरून पवारांनी राजकारणाचा जो विचका केला, त्याची सुरुवात त्यांनी २०१४ सालीच केली होती. म्हणूनच २०२४ च्या निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Result) निकालानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले तरी एकत्र निवडणूक लढवलेले पक्षच सत्ता स्थापन करतील, याची शाश्वती देता येत नाही. महाराष्ट्राला ही देण शरद पवारांनी दिली आहे.

जात्यंध राजकारणी

पवार आणि जातीयवाद हे समीकरण आहे, असा आरोप राज ठाकरे कायम करत आले आहेत. पवारांनी त्यांचा पक्ष १९९९ साली सुरु केला. तेव्हापासून राज्यात जातीजातींमध्ये भांडणे सुरु झाली. आजच्या घडीला महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्याला हवा देऊन शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरूद्ध अनुसूचित जाती, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, अशी भांडणे लावली, त्यासाठी त्या त्या गटात मोहरे उभे केले, मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांनी पाठबळ दिलेले व्यक्तीमत्व असल्याचा आरोप आधीपासून होत आहे.

(हेही वाचा Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?)

जनतेच्या मतांचा अनादर करणारा नेता

शरद पवारांच्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election Result) निकालानंतर चित्र कसे असेल याची कल्पना करणे कठीण असली तरी पवार सत्तेपासून दूर जाण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यातही महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला मिळाल्या आणि सरकार स्थापन करण्यात फार अडचणी निर्माण येणार नाही, असे वातावरण असल्यास पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही. महायुतीने बहुमताचा आकडा गाठला तरी पवार महायुतीला सहजासहजी सत्तेपर्यंत पोहोचू देतील, याबाबत शंकाच आहे. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशीही (अर्थात शिंदे-अजित पवार यांच्याकडे पुरेशा जागा असतील तर) संगनमत करून सत्तेत राहू शकतात. असे होईलच हे सांगता येत नाही, मात्र भाजप-काँग्रेस सोडून पवार सोबत असतील अन्य कोणताही पक्ष कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. असे पवारांनी केले तर राजकाणातील उरलीसुरली साधन शुचिता संपून जाईल. त्यामुळे मतदारांच्या मताला मात्र शून्य किंमत आहे, असा संदेश जनता जनार्दनामध्ये जाईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.