Maharashtra Assembly Election Result : महायुतीसोबत राहणार की Ajit Pawar ‘मविआ’त जाणार?

जर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने बहुमत आले, तर अजित पवार महायुतीमध्ये राहतील आणि सत्तेचा लाभ घेत पक्ष वाढवतील. पण जर महाआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार यांची गरज वाटली तर ते काकांच्या हाकेला अटीशर्थीसहीत धावून जाऊ शकतील आणि स्वतःची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करू शकतील

215
  • नित्यानंद भिसे

अजित पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. म्हणूनच शरद पवार (Ajit Pawar) यांनी जेव्हा २ मे २०२३ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत पक्षातील पहिल्या फळीतील बरेचसे नेते आणि उपस्थित कार्यकर्ते शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यास सांगत होते, तेव्हा अजित पवार यांना मात्र शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी असेच वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसा आपल्याकडेच असावा, असा अजित पवारांचा आग्रह होता. परंतु शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आणि तेव्हापासून अजित पवारांचा उठाव सुरू झाला. अजित पवारांनी पक्षाचा सूत्रधार होण्याची महत्वाकांक्षा पूर्णही केली. (Maharashtra Assembly Election Result)

WhatsApp Image 2024 11 21 at 7.28.21 PM

बंडखोर ते पक्षाचे अध्यक्ष

भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे सरकार येताच अजित पवारांनी (Ajit Pawar) एकनाथ शिंदेंप्रमाणेच राष्ट्रवादीतील ४० आमदार फोडून महायुती सरकारमध्ये गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत अध्यक्ष आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Assembly Election Result) उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मदतीने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन ‘मविआ’चे सरकार स्थापन करण्याची रणनीती आखायला सुरुवात केली होती, तेव्हा अचानक एके दिवशी पहाटे अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहचले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पुढे ज्या ५६ आमदारांच्या सह्यांच्या पाठिंब्याचे पत्र असल्याचे अजित पवार सांगत होते, त्यातील एक एक करत सगळे आमदार पुन्हा शरद पवारांना भेटले आणि अडीच दिवसांत सरकार कोसळले. पण २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी ४० आमदार फोडून भाजपा-शिवसेना सरकारमध्ये गेले, यावेळी त्यांचे बंड यशस्वी झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीला दोन्ही गटाला सामोरे जावे लागले, त्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाचा मोठा पराभव झाला, त्यांचा अवघा १ खासदार निवडून आला, मात्र शरद पवार गटाने ८ खासदार निवडून आणले. (Maharashtra Assembly Election Result)

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

पुन्हा बंड करण्याची शक्यता

आता विधानसभा निवडणुकीलाही (Maharashtra Assembly Election Result) अजित पवार गट महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वाट्याला ५५ जागा आल्या आहेत. तर शरद पवार गटाच्या वाट्याला ८६ जागा आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात अजित पवार यांना महायुतीत ठेवण्याबाबत नाराजी वाढली, ती अनेकदा उजेडात आली. विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) जागा वाटपात अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्याने ही नाराजी आणखी वाढली. त्यामुळे अजित पवार महायुतीमध्ये फिट नाहीत, हे भाजपा आणि संघ यांतील कार्यकर्त्यांनी मनाशी ठाम करून ठेवले आहे. पण जर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने बहुमत आले, तर अजित पवार महायुतीमध्ये राहतील आणि सत्तेचा लाभ घेत पक्ष वाढवतील. पण जर महाआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची गरज वाटली तर अजित पवार काकांच्या हाकेला अटीशर्थीसहीत धावून जाऊ शकतील आणि स्वतःची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करू शकतील. अजित पवार यांची २०१९पासूनची बंड पुकारण्याची पार्श्वभूमी पाहता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Assembly Election Result) अजित पवार पुन्हा बंड करणार नाहीत, याची शाश्वती देता येणार नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.