Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर यांच्या अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्राच्या राजकारणात जरी महायुतीची सत्ता आली किवा मविआची सत्ता आली तरी वंचितचा सत्तेत सहभाग नसणारच, १७२ उमेदवारांपैकी १-२ उमेदवार निवडून आले तरी वंचितसाठी खूप आहे. जर एकही उमेदवार निवडून आला नाही तर मात्र वंचित निवडणुकीच्या राजकारणातून लुप्त झाली असेच समजावे लागेल.

92
  • सचिन धानजी

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत जन्माला आलेल्या वंचित बहुजन आघाडीने पदार्पणात जी चमक दाखवली होती, ती चमक २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दाखवता आलेली नाही. त्यामुळे वंचितची वाढ होण्याऐवजी त्या पक्षाचा आकार आणि कक्षा आकुंचित होत असल्याचे दिसते. आता २०२४ मधील विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election Result) वंचितने १७२ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, पण यावेळी एमआयएमची सोबत नाही. त्यामुळे भीम आणि मिम हा प्रयोग प्रकाश आंबेडकरांच्या सोबतीला नाही.

WhatsApp Image 2024 11 21 at 6.51.21 PM

२०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासोबत त्यांनी युती करून निवडणूक (Maharashtra Assembly Election Result) लढवण्याची तयारी केली होती. वंचित आणि शिवसेनेची दिलजमाई झाली होती, परंतु महाविकास आघाडीत त्यांना स्थान कुठे असेल हे पक्के होत नसल्याने तसेच शिवसेनेने आपल्या कोट्यातून जागा देण्याची अट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घातल्याने पुढे आघाडीसोबतही नाही आणि शिवसेनेसोबत युतीही नाही. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये वंचितने स्वबळावर लढवून ३८ उमेदवार उभे केले, पण त्यांच्या दोन चार उमेदवारांना सोडल्यास बाकीच्या उमेदवारांना पाच ते दहा हजार मतांचा पल्लाही गाठता आला नाही.

(हेही वाचा Maharashtra Election Exit Poll पहा एका क्लिकवर; महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार?)

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Result) वंचितने राज्यात १७२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. तरीही वंचित काही करिष्मा दाखवेल अशी सध्याची स्थिती नाही. पण जिथे अटीतटीच्या लढती आहेत आणि निसटते मताधिक्य उमेदवाराला मिळणार आहे, त्या ठिकाणी वंचितला मिळालेली मते ही निर्णायक ठरणार आहेत. अर्थात सरळ-सरळ महायुती किंवा महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसेल असे सांगता येत नाही, प्रत्येक ठिकाणचे स्थानिक पातळीवरचे चित्र वेगळे असू शकते. ही निवडणूक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या अस्तित्वाची असेल. या निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घसरला आणि एकही उमेदवार निवडून न आल्यास या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय स्थानही डळमळीत होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जरी महायुतीची सत्ता आली किवा मविआची सत्ता आली तरी वंचितचा सत्तेत सहभाग नसणारच, १७२ उमेदवारांपैकी १-२ उमेदवार निवडून आले तरी वंचितसाठी खूप आहे. जर एकही उमेदवार निवडून आला नाही तर मात्र वंचित निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Result) राजकारणातून लुप्त झाली असेच समजावे लागेल. प्रकाश आंबेडकर नवनवीन प्रयोग करणारे, नवनवीन भूमिका मांडणारे असले तरी ते जोवर कोणत्या तरी मोठ्या पक्षाशी सलगी करत नाही तोवर त्यांची ताकद वाढणार नाही हे निश्चित आहे. स्वतःच्या बळावर तिसऱ्या आघाडीचे पर्याय त्यांना फारसे फायद्याचे ठरत नाही, हेच खरे!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.