विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2024) २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहेत. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. त्यामुळे राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर Mumbai Police सतर्क; १० हजार पोलीस तैनात)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे (Amit Thackeray) , नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधी निवडणूक यंत्रणेकडून सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली. (Maharashtra Assembly Election Result 2024)
(हेही वाचा-राहुल गांधी, खरगे आणि सुप्रिया श्रीनेट यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार; Vinod Tawde यांचा इशारा)
धुळे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी अवघ्या काही वेळात मत मोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिक शहरातील मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या मध्य,पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघात काटे की टक्कर असल्याने या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी उमेदवारांमध्ये झालेले राडे या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. (Maharashtra Assembly Election Result 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community