Maharashtra Assembly Election 2024: १८ नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार!

78
Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) ची घोषणा केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक असल्याने तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) निर्भय व निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतदानाचा दिनांक व मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 18 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6 नंतर कोणत्याही प्रकारच्या राजकीय सभा घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा-महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी मनसेला संधी द्या; Raj Thackeray यांचे आवाहन)

तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते सदर मतदारसंघाचे मतदार नसतील अशा व्यक्तींनी मतदानाच्या निश्चित केलेल्या दिनांकाच्या 48 तासाच्या अगोदर सदर मतदारसंघ सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर बंदी आदेश सर्व विधानसभा मतदारसंघात 18 नोव्हेंबर रोजीचे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-अंतराळ स्थानकात 50 हून अधिक ठिकाणी गळती; Sunita Williams चा जीव धोक्यात ?)

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलिस अधिनिमय, 1951 चे कलम 135 व भारतीय नागरी सुरक्षा न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कार्यवाहीस पात्र राहिल, असे जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.