Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!

71
Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!
Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात (Marathwada) महायुती (Mahayuti) सरकारने लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी राज्यात सर्वाधिक नोंदणी केली. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result : महायुतीसोबत राहणार की Ajit Pawar ‘मविआ’त जाणार?)

पहिल्यांदाच विभागातील ४६ मतदारसंघांमध्ये महिला मतांची संख्या पुरुषांच्या तुलनेत वाढली आहे. पुरुष मतांमध्ये २०१९ च्या तुलनेत ६.४४ लाख मतांची वाढ झाली तर महिला मतांची संख्या ७.६० लाखांनी वाढली आहे. पुरुषांपेक्षा तब्बल १.१५ लाख अधिक महिलांनी या वेळी मतदान केले. विधानसभेसाठी २०१९ मध्ये ४४ लाख ४३ हजार ६२२ महिलांनी मतदान केले होते त्या तुलनेत या वेळी ही संख्या ७.६० लाखांनी वाढून ५२ लाख ३ हजार ८८४ झाली आहे, तर वाढलेल्या पुरुष मतदानाच्या तुलनेत या वेळी महिला मतांमध्ये तब्बल १ लाख १५ हजारांची वाढ झाली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election Result : दुकान बंद करण्याची वेळ Raj Thackeray यांच्यावर येणार नाही!)

मराठवाड्यातील ४६ पैकी सर्वाधिक महिला मतांची संख्या वाढलेल्या टॉप १० मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर, संभाजीनगर पश्चिम, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या सहांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.