Maharashtra Assembly Election 2024 : उबाठा गटाला मोठा धक्का; ‘हा’ बंडखोर नेता सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

258
Maharashtra Assembly Election 2024 : उबाठा गटाला मोठा धक्का; 'हा' बंडखोर नेता सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज
Maharashtra Assembly Election 2024 : उबाठा गटाला मोठा धक्का; 'हा' बंडखोर नेता सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणूकीची वेळ जवळ येत आहे तशी राजकीय उलथापालथ मोठ्या वेगाने होत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांकडून अनेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र शिवसेना उबाठा गटाकडून (Shiv Sena Ubhata group) मुंबईतील उमेदवारांची घोषणा करताच उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटात बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाकडून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हरून खान यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर नाराज झाले आहेत. ते उबाठा गटाकडून वर्सोवा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातून हरून खान (Haroon Khan) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आता राजू पेडणेकर (Raju Pednekar) हे सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू पेडणेकर हे तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, ते यावेळी वर्सोवातून पक्षाकडून निवडणूक  लढण्यास इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

(हेही वाचा – Vijaykumar Vyshak : भारतीय संघात विजयकुमार व्यक्ष, रमणदीप हे नवीन चेहरे)

दरम्यान दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपा (BJP) विधानसभेच्या १८ जागा लढवणार आहे. यापैकी विधानसभेच्या १४ मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जागांवर उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.