Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election 2024 : मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी २८८ इच्छुकांचे ३८८ अर्ज दाखल

82
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी २७ इच्छुकांनी ३४ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत ४१ इच्छुकांनी ५६ अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत ६ दिवसात ५१५ इच्छुकांचे एकूण ६६७ अर्ज दाखल झाले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
१६-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २७ इच्छुकांनी ३४ अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत ४१ इच्छुकांनी ५६ अर्ज दाखल केले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
नऊ विधानसभा क्षेत्रापैकी किनवटमध्ये १० इच्छुकांनी १६ अर्ज दाखल केले असून आतापर्यंत ३१ इच्छुकांनी ४५ अर्ज दाखल केले.
८४-हदगावमध्ये ३३ इच्छुकांनी ४८ अर्ज दाखल केले  ६६ इच्छुकांनी ८८ अर्ज दाखल केले. (Maharashtra Assembly Election 2024)
८५-भोकरमध्ये ७६ इच्छुकांनी ९३ अर्ज दाखल केले असून १४४ इच्छुकांनी १६७ अर्ज दाखल केले.
८६-नांदेड उत्तरमध्ये ५३ इच्छुकांनी ५६ अर्ज दाखल केले असून ८१ इच्छुकांनी ९७ अर्ज दाखल केले.
८७-नांदेड दक्षिणमध्ये ३८ इच्छुकांनी ५० अर्ज दाखल केले असून ५६ इच्छुकांनी ७३ अर्ज दाखल केले.
८८-लोहामध्ये १९ इच्छुकांनी ३१ अर्ज दाखल केले असून ३५ इच्छुकांनी ५४ अर्ज दाखल केले.
८९-नायगावमध्ये १८ इच्छुकांनी २७ अर्ज दाखल केले असून ३५ इच्छुकांनी ४८ अर्ज दाखल केले.
९०-देगलूरमध्ये २८ इच्छुकांनी ३९ अर्ज दाखल केले असून ४३ इच्छुकांनी ६० अर्ज दाखल केले.
तर ९१-मुखेडमध्ये १३ इच्छुकांनी १९ अर्ज दाखल केले असून २४ इच्छुकांनी ३५ अर्ज दाखल केले.
नांदेड जिल्ह्यातील एकूण ९ विधानसभेसाठी एकूण २८८ इच्छुकांनी आज ३८८ अर्ज दाखल केले तर ५१५ इच्छुकांनी ६६७ अर्ज दाखल केले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.