Maharashtra Assembly 2024 : भाजपाची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट

129
Maharashtra Assembly 2024 : भाजपाची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट
Maharashtra Assembly 2024 : भाजपाची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly 2024) भारतीय जनता पक्षाची (BJP Candidate List) चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दोन उमेदवारांची नावे मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहेत.   (Maharashtra Assembly 2024)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना पक्षाने तिकीट दिले आहे. तर उमरेडमधून सुधीर पारवे  (Sudhir Parve) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; महायुतीच्या ९, तर महाविकास आघाडीच्या २१ जागांचा पेच कायम)

महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्ष भाजपा आणि शिवसेनेने सोमवारी अनुक्रमे 25 आणि 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तर महायुतीच्या इतर मित्रपक्षांनी ६ जागांवर उमेदवार जाहीर केले. महायुतीने आतापर्यंत २८८ पैकी २८१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये भाजपाने १४८, शिवसेना ७८, राष्ट्रवादीने ४९ आणि इतर मित्रपक्षांनी ६ जागांवर उमेदवार दिले आहेत. म्हणजेच महायुतीने अजून ७ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.