माझ्यासारख्याचे असणेच पुरेसे, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही; Madhav Bhandari यांचा उद्धव ठाकरेंना टोला

87
माझ्यासारख्याचे असणेच पुरेसे, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही; Madhav Bhandari यांचा उद्धव ठाकरेंना टोला
माझ्यासारख्याचे असणेच पुरेसे, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही; Madhav Bhandari यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपण माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद, पण काळजीचं कारण नाही. माझी पक्षावरील निष्ठा ही सत्तेसाठी नसून ज्या विचारांसाठी आम्ही झटलो त्या विचारांवर आहे. आमच्यासाठी सत्ता हे विचार राबविण्याचे साधन आहे. कलम ३७० असो वा राम मंदिर, पुरावे अनेक मिळतील. काही लोकांसाठी विचार हे केवळ सत्तेचे साधन असतात हा भाग वेगळा, त्याचेही पुरावे अनेक आहेतच. असो, राहिला प्रश्न मी कमी दिसण्याचा. त्याचं असं आहे, माझ्यासारख्यांच असणंच पुरेस असत, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही, अशी टीका माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. (Shiv Sena – UBT)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

शिवसेना उबाठावर टीका करायला ही भाजपाला बाजारबुणगे लागतात. एकेकाळी युतीत माधव भंडारी (Madhav Bhandari) आपले सहकारी होते. मात्र युतीत फुट पडल्यावर माधव भंडारी आमच्यावर टीका करायला लागले. ते ठिक होत.. कारण आम्ही म्हणायचो, माधव भंडारी (Madhav Bhandari) टीका करतायतं, किमान ते भाजपा आणि संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. परंतु आता माधव भंडारी कुठे गेले कुणास ठाऊक? कारण शिवसेना उबाठावर (Shiv Sena – UBT) टीका करायला ही ह्यांना बाजारबुणगे लागतात, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्यावर केली. त्यानंतर माझ्यासारख्यांच असणंच पुरेस असत, आम्हाला रोज सकाळी दिसावं लागत नाही, अशी टीका भंडारी (Madhav Bhandari) यांनी ठाकरेंवर केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.