LPG Cylinder Rates Hiked: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागले!

190
LPG Cylinder Rates Hiked: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागले!
LPG Cylinder Rates Hiked: महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागले!

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर महागलं (LPG Cylinder Rates Hiked) आहे. सर्वात अखेरीस गॅस सिलेंडरच्या किंमतीत ९ मार्च २०२४ रोजी कपात केली होती. सरकारने होळीच्या वेळी नागरिकांना दिलासा दिला. १०० रुपयांची कपात केली होती. तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २०० रुपयांनी गॅस स्वस्त झाला होता. एका वर्षात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३०० रुपयांची कपात केली आहे. तर आता किंमतीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा –Kedarnath Cloudburst: केदारनाथमध्ये ढगफुटी, २०० भाविक अडकले)

आज १ ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे. त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर १५९८ रुपये होते. देशभरात ही वाढ आज पासून लागू करण्यात आली आहे. (LPG Cylinder Rates Hiked)

(हेही वाचा –Ujani Dam : दोन महिन्यांत उजनी धरणात ६० टीएमसी पाणी)

ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर मुंबईत ७ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दर वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली. (LPG Cylinder Rates Hiked)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.