लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवली; Ajit Pawar यांची स्पष्टोक्ती

67
Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”
Ajit Pawar : “अजित पवारांचा संघाविषयीचा निर्णय : युतीमध्ये वाढणाऱ्या तणावाचा संकेत?”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) गेल्या ८ ऑगस्टपासून राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. महिला, तरुण, शेतकरी यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत. वरूड येथील मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी कांदा उत्पादकांसह विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि संत्री उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत (loksabha election 2024) शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली. कांदा निर्यातबंदी होऊ नये तसेच सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा, यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमारची बोटाची दुखापत किती गंभीर? दुलिप करंडकाला मुकणार?)

४ हजार ३७२ कोटी रुपयांचा निधी

येत्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा देवेंद्राला मतदान रूपी आशीर्वाद द्या, राहिलेला संपूर्ण विकास पूर्णत्वास नेवून या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी वाट्टेल तितका निधी मी देईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी या वेळी दिली. मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या साडेचार वर्षांत इतिहासात कधी नव्हे, इतका ४ हजार ३७२ कोटी रुपयांचा निधी आणून संपूर्ण मतदारसंघात विकासकामे करण्यात आली आहे. तुमच्या मतदारसंघातील हा लोकप्रतिनिधी पाठपुरावा करणारा आहे, केवळ पाठपुरावाच नाही, घेतलेले कार्य पूर्ण करणारा युवा कार्यकर्ता आहे.

निधीची कमतरता पडू देणार नाही

या वेळी अजित पवार पुढे म्हणाले की, माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची फार ओळख नव्हती; परंतु मोर्शी मतदारसंघाचा विकास व्हावा, बेरोजगारांच्या हाताला कामे मिळावी, महिलांचे प्रश्न सुटावे, संत्रा, मोसंबी, कपाशीला भाव मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस सतत पाठपुरावा करीत असतात, त्याला मी निधीची कमतरता पडू देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात कोणीच एवढा निधी केवळ एका मतदारसंघासाठी आणला नाही मात्र देवेंद्रने ते करून दाखवले. मी लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून फिरत आहे. मात्र एका लोक प्रतिनिधीवरील इतकं प्रेम आणि अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी जनसन्मान यात्रा पाहली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या वेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मी ज्या काही योजना महिला, शेतकरी आणि युवकांसाठी सुरु केल्या आहेत, त्या कायम राहणार आहे. संपूर्ण आर्थिक स्थितीचा अभ्यास करूनच या योजना तयार करण्यात आल्या आहेत. कोणत्याच योजनेकरीता निधीची करतरता पडू देणार नाही. या वेळी वरुड-मोर्शी तालुक्यातील संत्र फळगळ सुरु असून त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. झालेल्या नुकसानीचा अभ्यास करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन सुध्दा या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या जाहीर सभेला व्यासपिठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खा. प्रफुल्ल पटेल, आ. देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आ. अमोल मिटकरी, विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, राज्य उपाध्यक्ष वसंत घुखेडकर, राज्यसमन्वयक सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशसदस्य प्रमोद उर्फ बाळू पाटील, डॉ. मोनाली भुयार, जरुडचे माजी सरपंच सुधाकर मानकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, मालखेडचे सरपंच विजय वडस्कर, डॉ. सुधाकर बंदे, डॉ. मिना बंदे, ऋषीकेश राऊत, तारेश देशमुख, मार्ज पंचायत समिती सभापती नीलेश मगर्दे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.