Lok Sabha Election Result 2024 : मुंबईसह राज्यात मशाल कशी पेटली?

236
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) चार जागा जिंकल्या तर महायुतीला दोन जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या मागे मुंबईकर उभे राहिल्याने आघाडीची सरशी झाली. मराठी, दलित व मुस्लिम समुदाय आघाडीसोबत राहिल्याने महायुतीला पराभवाचा झटका बसला. शिवसेना फोडल्याने मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहिला; तर देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आल्याचा विरोधकांच्या प्रचारामुळे दलित, मुस्लिम असा अल्पसंख्याक समुदाय महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसते. शिवसेना फोडल्याचा व केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर यामुळे मुंबईकरांनी सत्ताविरोधी मतदान करत परिवर्तन केले, त्याचा फटका भाजपाला बसल्याचे स्पष्ट आहे. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – Pakistan Dinner Party : पाक क्रिकेटपटूंनी अमेरिकेत भरवली खाजगी डिनर पार्टी)

मुंबई, मराठवाड्याने तारले, तर कोकणाने मारले

मुंबई शहरातील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिल्याने त्यापैकी तीन जागा त्यांच्या पदरात पडल्या. सोबतच, आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची ठाकरेंना चांगली साथ मिळाली. त्यामुळेच त्यांना यश खेचून आणता आले. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लढल्या. मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय व मराठी मतदारांची मोठी संख्या असल्याने गायकवाड यांना उत्तर मध्य मतदारसंघ अनुकूल असतानाही विजयासाठी झगडावे लागले. (Lok Sabha Election Result 2024)

पहिल्या २० फेरीपर्यंत भाजपाचे (BJP) उज्ज्वल निकम आघाडीवर होते. अखेर शेवटच्या आठ-दहा फेरीत पिछाडी भरून काढत वर्षा गायकवाड यांनी १६ हजारांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या अनिल देसाई व अरविंद सावंत या दोन शिलेदारांनी सहज विजय मिळवला. ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी गुजराती बहुल मतदारसंघातून ३० हजारांच्या मताधिक्याने विजयश्री खेचून आणली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याचा फैसला यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने होणार होता. यात उद्धव ठाकरेंनी बाजी मारल्याचे दिसून येते. शिवसेना (उबाठा) गटाने लोकसभेच्या २१ जागांपैकी ९ जागांवर यश मिळवले. यात मुंबईतील तीन, मराठवाड्यातील चारपैकी तीन, उत्तर महाराष्ट्रातील तीनपैकी दोन, तर विदर्भातील दोनपैकी एक अशा ९ जागांवर विजयश्री मिळवला. (Lok Sabha Election Result 2024)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळणे ही सामूहिक जबाबदारी)

दरम्यान, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोकणातील पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सहाच्या सहा जागा उद्धव ठाकरेंना गमवाव्या लागल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई, मराठवाड्याने तारले, तर कोकणाने मारले असेच चित्र दिसले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वाधिक २१ जागा घेत मोठ्या भावाचा मान मिळवला, पण यशाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिली, जी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा कमी राहिली. बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, हातकंणगले, उत्तर पश्चिम मुंबई, मावळ अशा सात मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा पराभव करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला. ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळपास १७.१३ टक्के (सुमारे ९२ लाख मते) तर शिंदे यांच्या शिवसेनेला १३.४० टक्के (सुमारे ७१ लाख मते) मिळाली आहेत. जनतेने सध्या तरी उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेला पसंती दिली आहे. उत्तर पश्चिममध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर आणि शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ लढत झाली. (Lok Sabha Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.