लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी! सोशल मीडियावरुन कबुली

270
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी! सोशल मीडियावरुन कबुली
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी! सोशल मीडियावरुन कबुली

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi gang) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

(हेही वाचा-Baba Siddique Shot Dead: Zeeshan Siddiqui यांच्या घराबाहेर आरसीपी दल दाखल; बंदोबस्तात वाढ)

बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे. बाबा सिद्दीकी यांची तिन जणांनी हत्या केली होती. त्यातील दोघांना मुंबई पोलिसांनी पकडले आहे. तिसरा आरोपी हा फरार आहे. मात्र त्याचे नाव मुंबई पोलिसांना समजले आहे. त्याचे नाव शिवकुमार आहे. तो उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत. (Baba Siddique)

(हेही वाचा-Baba Siddique गोळीबाराचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगशी? १५ दिवसांपूर्वी धमकी आणि…)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार झिशान सिद्दीकींची भेट घेतली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर कुटुंबाचे अजित पवारांनी सांत्वन केले आहे. वांद्रे इथल्या निवासस्थानी जावून अजित पवारांनी हे सांत्वन केले. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याआधी आरोपी हे मुंबईत आले होते. ते कुर्ल्यात दोन सप्टेबरपासून राहात होते. मुंबई राहून त्यांनी सिद्दीकी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते हे ही आता तपासात पुढे येत आहे. (Baba Siddique)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.