कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल

128
कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल
कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि काँग्रेसकडून निवडणुक रिंगणात असलेले धीरज देशमुख यांच्या प्रचारसभेत मविआच्या कारभाराची भांडाफोड कर्नाटकच्या महिला मंत्र्यांनी केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या (Congress) महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) या धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत उपस्थित होत्या. त्यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महायुती (Maha Yuti) सरकार राबवत असलेल्या लाडकी बहिण योजनेचे महत्त्व एकाअर्थी अधोरेखित केले आहे. (Congress)

( हेही वाचा : Kailash Gahlot भाजपावासी; केजरीवाल यांच्यावर टीका

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) म्हणाल्या, कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजना फक्त कुटुंबातील एकाच महिलेसाठी आहे. मग ते पैसे कोणाच्या अकाऊंटमध्ये येतील, हे विचारू नका. घरातील प्रमुख महिलेच्या अकाऊंटमध्ये २००० रुपये कर्नाटक सरकारकडून टाकले जातात, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) म्हणाल्या. मात्र महाराष्ट्रातील महायुतीची (Maha Yuti) लाडकी बहिण योजना कुटुंबातील सर्वच महिलांसाठी आहे. त्यामुळे मविआ सत्तेत आल्यास अर्ध्याहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी टीका राजकीय वर्तुळात मविआवर केली जात आहे. (Congress)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.