Kolkata Rape-Murder Case: ममता बॅनर्जींना केंद्राकडून जोरदार प्रत्त्युत्तर! ‘प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही…’

109
Kolkata Rape-Murder Case: ममता बॅनर्जींना केंद्राकडून जोरदार प्रत्त्युत्तर! 'प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही...'
Kolkata Rape-Murder Case: ममता बॅनर्जींना केंद्राकडून जोरदार प्रत्त्युत्तर! 'प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही...'

कोलकाता (Kolkata Rape-Murder Case) येथे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या (Female Trainee Doctor) बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कायदे आणि वेळीच कारवाई करण्याची मागणी केली होती.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सीएम ममता यांचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा असल्याचे म्हटले आहे. कायदे आधीच कडक आहेत पण अशा प्रकरणांमध्ये वेळीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. (Kolkata Rape-Murder Case)

बंगालमध्ये बलात्काराचे ४८,६०० प्रकरणे प्रलंबित
अन्नपूर्णा देवी यांनी ममता बॅनर्जींना पाठवलेल्या उत्तर पत्रात लिहिले आहे की, बंगालमध्ये बलात्कार आणि पॉक्सोचे ४८,६०० प्रकरणे प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे निकाली काढण्यास राज्य सरकार दिरंगाई करत आहे. यावरून राज्य सरकारने जलदगती न्यायालये सुरू करण्यास दिरंगाई केल्याचे दिसून येते. ते म्हणाले की, ही न्यायालये बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांच्या सुनावणीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे कायदे पुरेसे आहेत, असे केंद्रीय मंत्र्यांनी लिहिले आहे. राज्य सरकारने या कायद्यांचे योग्य पालन केल्यास गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा होईल, असेही ते म्हणाले. (Kolkata Rape-Murder Case)

डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात संताप
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनियर डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे माजी प्राचार्य आणि चार डॉक्टरांसह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. (Kolkata Rape-Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.