Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जुंपली

199

Kolkata Doctor Rape case प्रकरणी सध्या राजकारण वाढले आहे, आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आता एकमेकांवर दोषारोप सुरु झाले आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी? 

Kolkata Doctor Rape case प्रकरणी राहुल गांधी यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्यासाठी रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यावरून त्यांच्या हेतूवर शंका येत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीत असूनही काँग्रेससोबत एकत्र निवडणूक न लढवता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढली. त्यामुळे काँग्रेस आणि टीएमसीमध्ये धुसफूस सुरु आहे.

(हेही वाचा Kolkata doctor rape-murder case: कोलकाता हत्या प्रकरणाचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद; डॉक्टरांचा संप, रुग्णसेवा ठप्प)

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? 

मी काँग्रेसला विचारू इच्छिते की, त्यांचेही अनेक राज्यात सरकार आहे. तुमच्या राज्यात ज्या घटना घडल्या त्यावर तुम्ही काय पावले उचलली, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Kolkata Doctor Rape case)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.