Kolkata Doctor Rape and Murder Case : पोलिसांनी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे सीबीआयचा आरोप

जेव्हा डॉक्टरची हत्या (Kolkata Doctor Rape and Murder Case) झाली तेव्हा मुख्य आरोपी संजय रॉय यांचे कपडे आणि सामान जप्त करण्यासाठी पोलिसांनी तब्बल दोन दिवस विलंब केला, असे सीबीआयने म्हटले.

122

कोलकाता आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर ९ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि हत्या प्रकरणात (Kolkata Doctor Rape and Murder Case) पोलिसांनी जी काही कागदपत्रे तयार केली, ती चुकीच्या पद्धतीने बनवली, असा गंभीर आरोप सीबीआयने सियालदह न्यायालयात केला.

जेव्हा डॉक्टरची हत्या (Kolkata Doctor Rape and Murder Case) झाली तेव्हा मुख्य आरोपी संजय रॉय यांचे कपडे आणि सामान जप्त करण्यासाठी पोलिसांनी तब्बल दोन दिवस विलंब केला. जर त्याच वेळी चौकशी झाली असती तर आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे मिळवता आले असते, असे सीबीआयने म्हटले. सीबीआयने पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) तपासासाठी पाठवले आहेत. संजय रॉय, वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांच्यातील गुन्हेगारी कटाचा तपास आता सीबीआय करत आहे. न्यायालयाने संदीप घोष आणि निलंबित पोलीस अधिकारी अभिजित मंडल यांच्या सीबीआय कोठडीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

(हेही वाचा BMC : अंधेरीत नाल्यात पडून महिलेचा मृत्यू; आयुक्तांनी नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती)

नार्को चाचणीची करणार मागणी 

दरम्यान 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत घोष यांची नार्को चाचणी आणि अभिजीत मंडलची पॉलिग्राफ चाचणीसाठी संमती मागितली जाणार आहे. सीबीआयने 14 सप्टेंबर रोजी अभिजीत मंडलला अटक केली होती. वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संदीप घोष हे 16 ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडीत होते. 2 सप्टेंबर रोजी सीबीआयने त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली. त्यांना 14 सप्टेंबर रोजी बलात्कार-हत्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.