Anil Deshmukh यांनी राजकीय स्टंट केला, असे नेटकरी का म्हणाले?

95
Anil Deshmukh यांनी राजकीय स्टंट केला, असे नेटकरी का म्हणाले?
  • खास प्रतिनिधी 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी तथाकथित दगडफेक झाली त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत हा राजकीय हल्ला असल्याचा आरोप करून, निषेध व्यक्त केला. त्याचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेत हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर काहीनी महाविकास आघाडीच्या काळात पालघरजवळ साधूंचे हत्याकांड झाले त्याची आठवण करून दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. शेम! शेम!” (Anil Deshmukh)


(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Yugendra Pawar यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी केले सर्च ऑपरेशन; बारामतीत नेमकं काय घडतयं?)

अनिल देशमुख यांचे पुत्र निवडणूक रिंगणात

विदर्भातील काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात भाजपाचे चरणसिंह ठाकूर निवडणूक रिंगणात आहेत. काही नेटकऱ्यांनी सलिल यांचा पराभव दिसू लागल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हा हल्ला स्वतःच केल्याचा संशय व्यक्त केला. तसेच काहींनी साधू हत्याकांडाचा व्हिडिओदेखील पोस्ट केला आणि साधूंना किती यातना झाल्या असतील? असा प्रश्न केला.

अशाच काही प्रतिक्रिया जशाच्या तशा :

-काय वेळ निवडली स्वतः वरील हल्ल्याची..सगळा प्रचार संपला…मग चर्चेत कसे राहायचे तर असे…एवढ्या दिवसात जे झाले नाही ते आज शेवटच्या दिवशी कसे घडले असेल बरं…विचार करा

-जरा विचार करा फक्त डोक्याला जखम झाली तर रडायला लागले…. पालघर साधू तर हसत हसत मरणाला समोरे गेले.त्यांना न्याय कधी मिळणार… कर्माचे फळ याच जन्मात मिळणार मूर्ख संज्या.कोणीही त्याला अपवाद नाही…

-एवढ्या दिवसांपासून प्रचार सुरू होता काहीच झाले नाही. आणि अचानकच कसा काय हल्ला झाला ? असल्या घटनेची चौकशी व्हायला हवी. कारण हल्ला करण्यासारखे काहीही कारण दिसत नाही !

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांची भाषा घसरली, त्यांना जेलमध्ये टाका; Ramdas Kadam यांची मागणी)

-संजय राऊतजी, कदाचित अनिल देशमुख यांनी पुन्हा ‘खंडणी’ मागितली असेल, म्हणूनच गोंधळ उडाला असेल! जेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात जेलची सफर केली होती ना? आता त्या इतिहासाला झाकण्यासाठी तुम्ही ‘शेम शेम’चं नाटक करताय. तुमचं हे राजकीय ढोंग जनता खूप चांगलं ओळखतेय!

-खोटा हल्ला करुन टोमॅटो सॉस लावून फिरण्याची स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांनो.. जरा तरी लाज बाळगा..

-कोणता केचप use केला आहे. चांगला कलर दिसतोय

-सब कर्मों का फल है पालघर में साधु के साथ जो घटित हुआ उस समय यही गृहमंत्री था हरामखोर

-सहानुभूती साठी लावलेले सॉस आहे हे.. जसे किरीट सोमैय्या यांना झालेल्या हल्ल्या नंतर तू बोलाल्ल राऊत

-MVA आलं की रक्त. NDA ला आलं की टोमॅटो सॉस!

-स्वतःच केलेला राजकीय स्टंट

-अरे संज्या किरीट सोमय्या वर हसणारा तुचं आता शेम शेम करताय …आता वसुलीबाज परत नको म्हणून लोकांनी पळवुन लावले ह्या भ्रष्ट माजी गृहमंत्र्याला.


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.