मुस्लिम मतांसाठी ‘लव्ह जिहाद’ आणि दहशतवादाचे समर्थन करणार का? किरीट सोमय्यांचा मविआला सवाल

48
मुस्लिम मतांसाठी 'लव्ह जिहाद' आणि दहशतवादाचे समर्थन करणार का? किरीट सोमय्यांचा मविआला सवाल
मुस्लिम मतांसाठी 'लव्ह जिहाद' आणि दहशतवादाचे समर्थन करणार का? किरीट सोमय्यांचा मविआला सवाल

‘द केरळा स्टोअरी’च्या माध्यमातून प्रपोगंडा पसरवला जात आहे, केरळला बदनाम केले जात आहे, असे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट निर्मात्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. याच मागणीविषयी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला सवाल केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

”द केरळा स्टोअरी’चे निर्माते यांना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही निषेध करीत आहोत. मुस्लिम मतांसाठी आपण लव्ह जिहाद आणि दहशतवाद याचे समर्थन करणार का? असा माझा महाविकास आघाडीला प्रश्न आहे,’ असे किरीट सोमय्या म्हणाले.

(हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे काकांना दादांची भिती वाटतेय का?)

जितेंद्र आव्हाड ‘द केरळा स्टोअरी’ चित्रपटाविषयी आणखी काय म्हणाले….

ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी लिहिले की, ‘केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे. जो भारताचा ७६ टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही ०.७६ टक्के आहेत. देशामध्ये ती २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे. त्या चित्रपटामध्ये जी ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी ३२ हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.