Karnataka Election Results 2023 : भाजपाला धक्का; काँग्रेस पक्षाची आघाडी

काही दिवसांपूर्वी एक्झिट पोलचा कौल देखील काँग्रेसच्या बाजूने दिला होता.

171
Karnataka Election Results 2023
Karnataka Election Results 2023 : भाजपाला धक्का; काँग्रेस पक्षाची आघाडी

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला आहे. या निकालानुसार भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. काही दिवसांपूर्वी एक्झिट पोलचा कौल देखील काँग्रेसच्या बाजूने दिला होता. त्यानुसार जनतेने देखील अंतिम निर्णय काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणूक : जनतेचा कौल कोणाच्या बाजूने?)

काँगेस विजयी

काँग्रेस १३४ जागांवर आघाडीवर आहे. (Karnataka Election Results 2023) म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप ६५ जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस २१ जागांवर पुढे आहे. इतरांची ४ जागांवर आघाडीवर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.