Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये २२४ जागांवर मतदानाला सुरुवात; २६१५ उमेदवारांचे भवितव्य पणाला

40
Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये २२४ जागांवर मतदानाला सुरुवात; २६१५ उमेदवारांचे भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये २२४ जागांवर मतदानाला सुरुवात; २६१५ उमेदवारांचे भवितव्य पणाला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला बुधवारी, १० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे ५ कोटी ३१ लाख मतदार ठरवणार आहेत. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदा २ हजार ६१५ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. १३ मेला मतदानाची मोजणी होणार असून कर्नाटकांतील या रणांगणात अनेक दिग्गज नेते उतरले आहेत.

मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

आतापर्यंत कोणी-कोणी मतदानाचा हक्क बजावला?

दक्षिणेतील दिग्गज अभिनेते प्रकाश राज, सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते सीएन अश्वथ नारायण, कन्नड अभिनेत्री अमुल्य, कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र, कर्नाटकचे मंत्री आणि भाजप नेते सुधाकर, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यासर्व मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.

(हेही वाचा – Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार ११ मे रोजी मुंबईत; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट)

दिग्गज नेते निवडणुकीच्या रणांगणात

कर्नाटक निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या दिग्गज उमेदवारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांचे आहे, जे शिगगाव विधानसभा मतादरसंघातून उभारले आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जनता दल नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी रामनगर जिल्ह्यातील चनापटना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्रे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे असे मोठे चेहरे कर्नाटक निवडणूक लढवत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.