Karad South मध्ये मतदार इतिहास घडवणार?

104
Karad South मध्ये मतदार इतिहास घडवणार?
  • सुजित महामुलकर

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात केवळ तीन व्यक्तींनी आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यात १९५१ ते १९७८ पर्यंत सहावेळा यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी दोन वेळा १९५१ आणि १९५७ ते शेतकरी कामगार पक्षाकडून (शेकाप) तर उर्वरित चारवेळा (१९६२, १९६७, १९७२ आणि १९७८) त्यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. (Karad South)

सातवेळा काँग्रेसचे पाटील

१९७८ नंतर १९८० ते २००९ अशा सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचे विलासराव पाटील हे कराड दक्षिण या मतदारसंघातून निवडून विधानसभेत गेले. तर २०१४ आणि २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघावर पकड निर्माण केली. (Karad South)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांनी ‘ते’ पुस्तक दाखवून संविधानाची केली कुचेष्टा   )

पृथ्वीराजबाबा विरुद्ध अतुलबाबा

गेल्या दोनही विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांना भाजपाचे तरुण उमेदवार अतुल भोसले यांनी आव्हान दिले मात्र चव्हाण यांनी भोसले यांना चिटपट केले. मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण तसेच अतुल भोसले दोघांना पृथ्वीराजबाबा आणि अतुलबाबा या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. २०१४ मध्ये दोन्ही बाबांमध्ये जवळपास १८,००० मतांचा फरक होता. चव्हाण यांचे ते मताधिक्य २०१९ मध्ये अर्ध्याने कमी करून ९,००० वर आणले. गेल्या पाच वर्षात अतुल भोसले यांनी कराडमध्ये आपल्या कामात सातत्य ठेवले आणि जनमानसात ठसा उमटवला. (Karad South)

काँग्रेसला हादरा?

अतुलबाबा हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. फडणवीस यांनीही अतुल भोसले यांना ताकद दिली. मतदारसंघात भोसले यांच्या मार्फत अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने यावेळी कराड दक्षिणमधील वातावरण बदलल्याचे चित्र आहे. पृथ्वीराजबाबांपेक्षा अतुलबाबांची हवा जास्त असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि पर्यायाने काँग्रेसला कराड दक्षिणमध्ये मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भोसले यांनी काँग्रेसचा पराभव केल्यास नवा इतिहास घडेल. (Karad South)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.