केजरीवालांना दिल्लीच्या विकासापेक्षा भांडण्यातच जास्त रस; Kailash Gahlot यांची टीका

96
केजरीवालांना दिल्लीच्या विकासापेक्षा भांडण्यातच जास्त रस; Kailash Gahlot यांची टीका
  • प्रतिनिधी 

दिल्लीच्या विकास कामाकडे लक्ष न देता विरोधी पक्षासोबत भांडण्यातच केजरीवाल जास्त वेळ घालवितात. यामुळे राज्यातील अनेक विकास प्रकल्प थांबले असल्याची टीका कैलास गहलोत (Kailash Gahlot) यांनी केजरीवाल यांच्यावर केली. आम आदमी पासूनच आप पक्ष दूर जात असल्यामुळे नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. माझ्या सारख्या अनेक नेत्यांना पक्ष सोडावा लागतोय, यासाठी केजरीवाल जबाबदार असल्याची टीका कैलास गहलोत यांनी केली. तसेच ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थितीमध्ये भाजपा मुख्यलयात भाजपामध्ये प्रवेश केला.

आम आदमी पार्टी (आप) आणि दिल्ली सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांनंतर कैलास गहलोत (Kailash Gahlot)  यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते.

(हेही वाचा – हे चाललंय तरी काय? चक्क Vande Bharat Train मधील प्रवाशाला अन्नात सापडले किडे)

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गहलोत (Kailash Gahlot)  म्हणाले, हा निर्णय एका रात्री घेण्यात आलेला नाही, तर विचार पूर्वक घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नसून स्व मर्जीने भाजपात प्रवेश करतो आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यात कधीही दबावाखाली काम केलेले नाही. ईडी, सीबीआयच्या दबावाखाली मी हे कृत्य केल्याचे ऐकायला मिळत आहे, पण तसे नाही.

गहलोत (Kailash Gahlot)  म्हणाले की, वकिली सोडल्यानंतर मी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते अण्णाजींच्या काळाशी संबंधित होते. हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी नोकरी आणि काम सोडले. आम्ही एका विचारधारेशी जोडलेले होतो, आम्हाला पक्ष आणि व्यक्तीमध्ये आशा दिसली. दिल्लीतील जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ते सतत जोडलेले होते, राजकारणात येण्याचा हा एकच उद्देश होता. ज्या मूल्यांसाठी त्यांनी पक्षात प्रवेश घेतला होता, त्या मूल्यांशी तडजोड होताना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे. ही माझी वेदना आहे आणि हीच हजारो-लाखो कार्यकर्त्यांची भावना आहे. ते आम आदमीच्या सेवेसाठी जोडले गेले होते, परंतु या आम आदमींना वाटते की ते विशेष झाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.