राहुल गांधी कॉंग्रेसचा ‘फुसका बार’; J. P. Nadda यांनी पत्र लिहून साधला जोरदार निशाणा

105
राहुल गांधी कॉंग्रेसचा 'फुसका बार'; J. P. Nadda यांनी पत्र लिहून साधला जोरदार निशाणा
  • प्रतिनिधी 

देशातील दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांमध्ये ‘लेटर-वॉर’ छेडले गेले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले होते. जेपी नड्डा (J. P. Nadda) यांनी गुरुवारी खरगे यांना पत्र लिहून कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांचा चांगला समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून कॉंग्रेस पक्षाला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. कॉंग्रेसने मागील १० वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ११० शिव्या दिल्या असल्याची आठवण करून दिली आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे नेते आक्षेपार्ह शब्दात विधान करीत असल्याचा आरोप करीत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले होते. जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी खरगे यांच्या पत्राला चांगले खरमरीत उत्तर दिले. खरगे यांनी केंद्रीय मंत्र्यावर कारवाईची मागणी केली असता भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पत्र लिहिले. जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी पत्र लिहून काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देशातील सर्वात मोठा दहशतवादी म्हटले होते. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. काँग्रेस प्रमुखांनी केंद्रीय मंत्र्यावर कारवाईची मागणी केली होती. जे. पी. नड्डा यांनीही खरगे यांच्या पत्राला उत्तर म्हणून पत्र लिहिले आहे.

(हेही वाचा – Assembly Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं; ‘इतक्या’ जागांवर दावा)

जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला

या पत्रात जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “आदरणीय खरगे जी, राजकीय मजबुरीमुळे जनतेने वारंवार नाकारलेला तुमचा ‘फुसका बार’ पुन्हा एकदा उडविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना लिहिलेले पत्र वाचल्यानंतर मला वाटू लागले की, आपले आरोप हे सत्यापासून दूर आहेत.’’

भाजपा अध्यक्षांनी पत्रात लिहिले की, “राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती किती वाईट शब्दांचा वापर केला होता हे आपण विसरलात काय? सोनिया गांधी यांनी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. ही भाषा आपल्याला असभ्य वाटली नाही काय? त्यांनी पुढे लिहिले की, “काँग्रेस आणि कॉग्रेसच्या नेत्यांनी १० वर्षांत देशातील प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११० पेक्षा जास्त वेळा शिवीगाळ केली आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्वही यात सहभागी आहे. एकीकडे तुम्ही राजकीय शुद्धतेबद्दल बोलत आहात तर दुसरीकडे तुमच्या नेत्यांची अशी दुटप्पी वृत्ती का आहे?

(हेही वाचा – BJP Candidate List : भाजपाच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला)

केंद्रीय मंत्री राहुलबद्दल काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी बिहारमधील भागलपूरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्याने राहुल गांधी भारतीय नसल्याचे म्हटले होते. त्यांचा बराचसा वेळ भारताबाहेर गेला आहे. त्याचे मित्र आणि नातेवाईक सर्व परदेशी आहेत. एवढा मोठा विरोधी पक्षनेता असूनही त्यांना गरिबांच्या वेदना समजू शकल्या नाहीत. त्यांना रिक्षावाले, हातगाडी विक्रेते, मोची यांच्या वेदना समजत नाहीत. ते फक्त अशा लोकांकडे जाऊन फोटोग्राफी करतात.

जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी पत्रात विचारले की, ‘खरगे जी, काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या कोणत्या गोष्टीवर अभिमान आहे? राहुल गांधी पाकिस्तान समर्थक आणि भारतविरोधी लोकांसोबत हात मिळवितात याचा अभिमान आहे की दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यक्रमात जाऊन उभे राहतात याचा अभिमान आहे? ते देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठिशी उभे राहतात, ते देशात आरक्षण आणि जातीचे राजकारण करून एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकवतात, परदेशात जाऊन आरक्षण रद्द करून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा आपला मानस व्यक्त करतात, जम्मू-काश्मीरमधील शांततेच्या विरोधात आहेत. दहशतवाद्यांच्या सुटकेला, पाकिस्तानशी चर्चा, पाकिस्तानशी व्यापार आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्यास समर्थन देतात म्हणून? ते हिंदूंना पाकिस्तानी दहशतवादी संघटनांपेक्षा मोठा धोका म्हणतात की हिंदू सनातन संस्कृतीचा वारंवार अपमान करतात म्हणून? ते लष्कराच्या जवानांकडे पुरावा मागतात. सैनिकांच्या शौर्याला ‘रक्ताची दलाली’ म्हणतात. शीख बांधवांच्या पगडी आणि बांगड्यांवरून वादग्रस्त विधाने करतात. राहुल गांधी यांच्या यापैकी कोणत्या गोष्टीवर आपल्याला अभिमान वाटतो आहे, असे प्रश्न नड्डा (J. P. Nadda) यांनी पत्रात विचारले आहेत. अशा परिस्थितीत तुमचे पत्र लिहिल्याने काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड होतो की नाही? असा प्रश्नही खरगे यांनाही विचारला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.