Jogeshwari East Assembly Constituency : पुन्हा वायकर विरुद्ध किर्तीकर 

342
Jogeshwari East Assembly Constituency : पुन्हा वायकर विरुद्ध किर्तीकर 
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीवर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या अटीतटीची लढत पहायला मिळाली होती, तशीच लढत पुन्हा विधानसभा निवडणुकीत वायकर विरुद्ध किर्तीकर यांच्यात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी बॅनर आणि सोशल मीडियाद्वारे आपली ओळख देत प्रचाराला सुरुवातही केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्या नावाची चर्चा असल्याने तसे झाल्यास पुन्हा एकदा वायकर विरुद्ध किर्तीकर अशी लढत पहाता येणार आहे. (Jogeshwari East Assembly Constituency)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्यात रंगतदार लढत झाली आहे. या लढतीत रवींद्र वायकर हे विजयी ठरले असून यामुळे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात त्यांनी आगामी निवडणुकी त आपल्या पत्नी मनीषा वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मनीषा वायकर यांचे बॅनर जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात सर्वत्र पदाविषयी करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रचारही सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातून मनीषा वायकर या निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. मात्र त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये अमोल किर्तीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. (Jogeshwari East Assembly Constituency)
लोकसभा निवडणूक लढवलेली असल्याने त्यांच्यासाठी जोगेश्वरी हे एकमेव विधानसभा क्षेत्र जात आहे. त्यामुळे अमोल किर्तीकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अमोल किर्तीकर यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असली तरी त्याच्यासाठी दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व हे मतदारसंघ त्यांच्यासाठी पूरक व पोषक  नाही किंबहुना या ठिकाणी उबाठा शिवसेनेकडे उमेदवार उपलब्ध आहेत. त्यातुलनेत जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात बाळा नर यांचे नाव चर्चेत असले तरी पक्ष अमोल किर्तीकर यांच्या नावाचा विचार करू शकतो, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल किर्तीकर यांना या मतदारसंघातून चांगल्या प्रकारची मतप्राप्त झाल्याने किर्तीकर यांची दावेदारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळेच किर्तीकर यांना जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिल्यास या विधानसभेत वायकर विरुद्ध किर्तीकर असंच चित्र दिसून येण्याची शक्यता आहे. (Jogeshwari East Assembly Constituency)
या मतदारसंघात रविंद्र वायकर हे सन २००९ पासून सलग निवडून येत असून या मतदारसंघात त्यांची मजबूत पकड आहे. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा रवींद्र वायकर यांनी आपल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी अशी विनंती करत तयारी दर्शवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभेत वायकर यांना ७२,११८ मते तर किर्तीकर यांना ८३,४०९ मते मिळाली होती. त्यामुळे वायकर यांना स्वतःच्या मतदारसंघात कमी मते मिळाली असल्याने जोगेश्वरी विधानसभा काबीज करण्याचे उबाठा शिवसेनेचेच मनसुबे आहेत आणि त्याचसाठी किर्तीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Jogeshwari East Assembly Constituency)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.