G-20 Summit : अमेरिका आता चीनच्या अध्यक्षांची मनधरणी करणार; जो बायडेन यांनी व्यक्त केली आशा !

25
G-20 Summit : अमेरिका आता चीनच्या अध्यक्षांची मनधरणी करणार; जो बायडेन यांनी व्यक्त केली आशा !
G-20 Summit : अमेरिका आता चीनच्या अध्यक्षांची मनधरणी करणार; जो बायडेन यांनी व्यक्त केली आशा !

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेत (G-20 Summit) सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. शी जिनपिंग या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याच्या बातम्या आहेत. 31 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन येथे पत्रकारांशी बोलताना बायडेन म्हणाले की, ‘मला आशा आहे की, ते सहभागी होतील.’ पुढील आठवड्यात जो बायडेन यांच्यासह जागतिक स्तरावरील सुमारे २ डझन नेते नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषेदेचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

(हेही पहा – Air pollution : हवा प्रदूषणामुळे भारतियांचे आयुष्य झाले ‘इतक्या’ वर्षांनी कमी; अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती)

दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेसाठी (G-20 Summit) आल्यानंतर जो बायडेन आणि शी जिनपिंग यांची भेट होईल का, याविषयी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी साशंकता व्यक्त केली आहे. अधिकारी म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात सॅन फ्रान्सिस्को येथे होणार्‍या आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को ऑपरेशन ( APEC) शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता अधिक आहे.

भारत आणि चीनमधील तणाव पुन्हा वाढला

बीजिंगने अरुणाचल प्रदेशचा भारतीय भूभाग चीनचा भाग म्हणून दर्शविणारा नकाशा जारी केल्याने या आठवड्यात भारत आणि चीनमधील संबंध नव्याने ताणले गेले आहेत. नकाशात भारताच्या चीनने बळकावलेल्या अक्साई चीनचाही समावेश चीनच्या हद्दीत करण्यात आला आहे. भारताने मंगळवारी चीनकडे औपचारिक आक्षेप नोंदवला. भारताशिवाय नेपाळ, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपिन्स या अनेक देशांनीही या नकाशावर आक्षेप घेतला आहे.

अध्यक्ष झाल्यापासून शी जिनपिंग यांनी G20 च्या सर्व बैठकांना व्यक्तिशः हजेरी लावली आहे. सध्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग भारतात येतील का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. (G-20 Summit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.