Jitendra Awhad यांचा बलात्काऱ्याला पाठिंबा; ”मुलगी मरू दे, नाहीतर काही होऊदे”; ऑडिओ क्लिप व्हायरल…

ही ऑडिओ क्लिप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट केली आहे.

356

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि वाद एक समीकरण झाले आहे. लोकांना बउचलून आणून बंगल्यावर आणणे आणि बेदम मारणे, कुठेही दंगल झाली की, हिंदूंना बदनाम करणे यांसारख्या गोष्टींमुळे आव्हाड कायम वादात असतात. सवंग लोकप्रसिद्धीसाठी ते नेहमी वादग्रस्त विधाने आणि कृत्य करत असतात. आता हेच आव्हाड एका बलात्काऱ्याला पाठिंबा देत मदत मागायला आलेल्या मुलीबाबत ‘मरू दे तिला’, असे त्या कार्यकर्त्याला सांगतानाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

ही ऑडिओ क्लिप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट केली आहे. त्यावर ‘बलात्कार होऊ दे नाहीतर मरू दे, पवार साहेबांपर्यंत विषय पोहचला आहे. —गेली ती मुलगी’ असे आव्हाड कार्यकर्त्यांशी बोलतानाचे संवाद या पोस्टमध्ये लिहिले आहेत. त्याखाली ‘महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या या राजकारण्याचे महिलाबद्दल मत बघा’, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर)

काय म्हटले आहे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या क्लिपमध्ये? 

या क्लिपमध्ये मल्लिकार्जुन पुजारी नावाचा कार्यकर्ता फोनवर जितेंद्र आव्हाडांशी बोलत आहे.

जितेंद्र आव्हाड :  तू कुठलातरी माणसाला कुठल्या तरी पोरीवरून ब्लॅकमेल करतोस, हे प्रकरण शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यत गेले आहे.
कार्यकर्ता :  ‘ब्लॅकमेल नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली होती.
आव्हाड :  —गेली ती मुलगी, नको ते उद्योग करतोय. टी सिरीजचा मालक आहे तो.
कार्यकर्ता :  हो साहेब माहित्येय मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती.
आव्हाड : अरे जाऊ दे मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतोस त्याच्यामध्ये.
कार्यकर्ता : मी काय बदनाम, मी काय बोललो त्या माणसाला? मी काहीच नाही बोललो ना…फक्त तोच मला म्हणाला की, त्या मुलीला समजवा, गुन्हा दाखल करू देऊ नका. मी म्हटले, मी काय समजावणार बाबा, तुझे काय असेल तर भेटून घे ना मुंबईमध्ये. बोलला मी समजावतो त्या मुलीला, ब्लॅकमेलचे काय आले त्यात.
आव्हाड : जाऊदे, तू मध्ये पडू नको, त्याला सांग तुझे तू बघ.
कार्यकर्ता : ठीक आहे साहेब.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.