Jitendra Awhad यांना मिळतात प्रत्येक युनिटवर ६ पैसे, म्हणजे वर्षाला ७ कोटी; ‘एमएसईडीसीएल’च्या वरिष्ठ अभियंत्याचा आरोप

162
Jitendra Awhad यांना मिळतात प्रत्येक युनिटवर ६ पैसे, म्हणजे वर्षाला ७ कोटी; 'एमएसईडीसीएल'च्या वरिष्ठ अभियंत्याचा आरोप

मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिरंगा टाइम्सचे पत्रकार इक्बाल भारती आणि ‘एमएसईडीसीएल’ चे वरिष्ठ अभियंता पांडुरंग हुंडेकरी यांच्यात संभाषण सुरु आहे.

(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?)

या व्हिडिओत ‘एमएसईडीसीएल’ चे वरिष्ठ अभियंता पांडुरंग हुंडेकरी म्हणतात, आव्हाड यांचे राजकारण एमएसईबीविरुद्ध आहे. त्यांना निवडून देण्यासाठी दुसरा कुठलाच स्कोप नाही. आव्हाडांचं राजकारण फक्त एमएसईबी, पालिकेचं पाणी याचं विषयांवर चालते. त्यांना ही या सगळ्याची पूर्ण माहिती आहे आणि त्यांनीच समस्या निर्माण केल्या आहेत. मला आव्हाडांचा (Jitendra Awhad) फोन आला होता, की प्रमोशन देतो. पण मी नको म्हंटलं. मला तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही. त्रास होतोय फार तिकडे. शेवटी मी शरद पवारांकडे लेखी तक्रार केली. आव्हाड कुठे कसे वागले, काय करतो, हे सगळं समोरासमोर बसून सांगितलं, असे पांडुरंग हुंडेकरी म्हणतात.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स करंडक नेण्याला आयसीसीची अखेर मनाई)

दरम्यान तिरंगा टाइम्सचे पत्रकार इक्बाल भारती विचारतात, मला माहिती मिळाली होती की, ६ पैसे पर युनिट आव्हाड (Jitendra Awhad) यांना द्यायचे टोरंटने कबूल केलं आहे. त्यावर वरिष्ठ अभियंता पांडुरंग हुंडेकरी म्हणतात, हो कबूल केलेले आहे. जे ३६६ आहेत ना त्यातील ६ पैसे त्याला (आव्हाड) आहेत. मुंब्रा कळवा धरून ७० एमयु युनिटचे ७ कोटी रुपये आव्हाडांना (Jitendra Awhad) मिळतात. म्हणजे ५० लाख दर महिन्याला आव्हाडांना मिळतात. म्हणून तर मग ती मॅडम गप्प आहे, असे वरिष्ठ अभियंता पांडुरंग हुंडेकरी व्हिडिओत म्हणतात. ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे आव्हाडांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झाल्याची चर्चा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.