Jharkhand Assembly Election : निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे काँग्रेसची फजिती

104
Jharkhand Assembly Election : निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे काँग्रेसची फजिती
  • प्रतिनिधी 

झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामुळे आचारसंहिता भंग करण्यात आली असल्याची तक्रार भाजपाच्यावतीने करण्यात आली होती. काँग्रेसने दिलेल्या भरघोस आश्वासनांमुळे काँग्रेसची चांगलीच फाजिती झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे झारखंड निवडणूक आयोगाने देखील आचारसंहिता भंग झाला असल्याचे मान्य केले आहे. यामुळे कार्यवाहीकडे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून त्याआधीच काँग्रेस झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराची वेळ संपल्यानंतर जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – बांगलादेशात ISKCON वर बंदी घातली नाही, तर हत्याकांड सुरूच राहणार; मौलवीचा युनूस सरकारला इशारा)

निवडणुकीआधी 48 तासांत कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येत नाही. तसेच जाहीरनामाही प्रसिद्ध करता येत नाही. कोणताही बडा नेता यादरम्यान प्रचारसभा घेऊ शकत नाही. या नियमापासून कुणीही अनभिज्ञ नाही. राहुल गांधी निवडणूक आयोगाला महत्त्व देत नाहीत. ते नेहमीच निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतात, अशी टीका खासदार संबित पात्रा यांनी केली होती. प्रचाराची वेळ संपल्यानंतर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याने भाजपाने टीका केली होती. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – ATP World Finals 2024 : एटीपी अंतिम फेरीत यानिक सिनर, टेलर फ्रिट्झ यांनी गाठली उपांत्य फेरी)

पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर संविधान आणि निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या देशात असा एक पक्ष आहे जो सातत्याने संविधानांचे उल्लंघन करत आहे. मतदानाच्या आधी 48 तासांचा सायलेंट पिरियड असतो, असे पात्रांनी सांगितले. काँग्रेसने मंगळवारी सायंकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये झारखंडमधील लोकांना सात मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना महिन्याला 2500 रुपये, 450 रुपयांत गॅस सिलिंडर, प्रत्येक व्यक्तीला सात किलो रेशनिंग, 10 लाख नोकऱ्या आणि 15 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशी आश्वासने देण्यात आली आहेत. (Jharkhand Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.