Jammu Kashmir Assembly Election : खासदार रजनी पाटील यांच्यावर जम्मू काश्मीरच्या प्रचाराची धुरा

95
Jammu Kashmir Assembly Election : खासदार रजनी पाटील यांच्यावर जम्मू काश्मीरच्या प्रचाराची धुरा
Jammu Kashmir Assembly Election : खासदार रजनी पाटील यांच्यावर जम्मू काश्मीरच्या प्रचाराची धुरा

काँग्रेसच्या अतिशय निष्ठावंत नेत्या रजनी पाटील (Rajani Patil) या सोनिया गांधी यांनी राजकारणात पाय ठेवल्याच्या दिवशीपासून त्यांच्यासोबत आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या त्या विश्वासू आणि निकटवर्तीय मानल्या जातात. पक्षाने त्यांना राज्यसभेवर दुसऱ्यांदा संधी दिली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय महिला विकास महामंडळाचे अध्यक्षपद, राज्याचे खादी ग्रामोद्योगचे अध्यक्षपदासह अनेक संघटनात्मक पदांवर काम केलेले आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणुक (Jammu Kashmir Assembly Election) होत आहे. या निवडणुकी मध्ये स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन, सलमान खुर्शीद, कन्हैया कुमार आदींच्या यादीत आता रजनी पाटील (Rajani Patil) असणार आहेत. यापूर्वी पाटील यांनी इतर राज्यांचे पक्षाचे प्रभारी म्हणूनही काम केलेले आहे. गांधी घराण्याच्या विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.

(हेही वाचा – Haryana Legislative Assembly : राहुल गांधी का घाबरले?)

काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu Kashmir Assembly Election) पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांचा समावेश आहे. यापूर्वी रजनी पाटील (Rajani Patil) यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे काँग्रेसचे प्रभारीपद सांभाळले आहे. जम्मू-काश्मिरचा राहुल गांधींचा दौराही त्यांच्याच प्रभारीपदाच्या काळात झाला होता.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी प्रभारीपद भूषविलेल्या रजनी पाटील आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu Kashmir Assembly Election) पक्षाच्या स्टार प्रचारक असतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.